HIjab : हिजाब न वापरल्याने महिलांवर बलात्कार; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य Saam TV
देश विदेश

HIjab : हिजाब न वापरल्याने महिलांवर बलात्कार; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

'हिजाब म्हणजे इस्लामधील पर्दा आहे, स्त्रीयांचे सौंदर्य लपविण्यासाठी तो असतो. महिला जेव्हा हिजाब घालत नाही तेव्हा त्यांचा बलात्कार होतो.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्नाटक : कर्नाटकमधील (Karnatak) कॉलेजमधून सुरू झालेला हिजाबचा (HIjab) वाद देशभऱात पसरला आहे. या वादावरती अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले तसेच हिंदू मुस्लीम आंदोलनही झाली आहेत. आणि होत असतानाच काँग्रेसच्या एका नेत्यानी हिजाब वापराबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

'महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात', असा नवा शोध काँग्रेस नेते जमीर अहमद (Congress Leader Jamir Ahmed) यांनी लावला आहे. माध्यमांशी बोलत असताना जमीर अहमद यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दरम्यान ते म्हणाले, हिजाब म्हणजे इस्लामधील पर्दा आहे, स्त्रीयांचे सौंदर्य लपविण्यासाठी तो असतो. महिला जेव्हा हिजाब घालत नाही तेव्हा त्यांचा बलात्कार होतो. आज देशात बलात्काराचे प्रमाण जास्त आहेत, कारण महिला आता हिजाबमध्ये राहत नसल्याचंही हे महाशय म्हणाले आहेत.

हिजाबच्या वादामुळे कर्नाटक सरकारने 9 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र आता आणखी ही महाविद्यालय बंद राहणार असून येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत ती बंद राहणार आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं कर्नाटक प्रशासनाने दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट; वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर दाखल

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT