BJP Vs Congress: "फडणवीस महाराष्ट्र द्रोही, मी गांधीवादी; मी नौटंकीबाज नाही" - नाना पटोले

BJP Vs Congress: , संस्कार आणि संस्कृतीचे दाखले देत आम्ही भाजपसारखे आंदोलन करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा अपमान केला. - नाना पटोले
BJP Vs Congress: nana patole slams to devendra fadnavis about modi's statement
BJP Vs Congress: nana patole slams to devendra fadnavis about modi's statementSaam TV
Published On

मुंबई: मुंबई कॉंग्रेसकडून आज राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंच्या विरोधात आंदोलन केले गेले. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. यामुळे मुंबईतील काही ठिकाणी नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला होता. या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कॉंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातही शाब्दिक खटके उडाले. नाना पटोले भाजपवर (BJP) टीका करत म्हणाले की, संस्कार आणि संस्कृतीचे दाखले देत आम्ही भाजपसारखे आंदोलन करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा अपमान केला. भाजपच्या केंद्रीय मंत्री, नेते, आमदार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला असं पटोले म्हणाले. ("Fadnavis is a traitor to Maharashtra, I am a Gandhian; I am not a dramatist" - Nana Patole)

हे देखील पहा -

नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्याचा कोणी अपमान करत असेल तर सहन केली जाणार नाही. वारकरी सहभागी झाले कारण नरेंद्र मोदीजी यांना कळायला हवे. संस्कार आणि संस्कृतीचे दाखले देत आम्ही भाजपसारखे आंदोलन करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा अपमान केला असा आरोप करत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मातांची महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच भाजपकडून मारून टाकू, कापून टाकू ही वक्तव्य येत आहेत, आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला आरोपही त्यांनी केला आहे.

नमस्ते ट्रम्प झाला आणि कोरोना आला असं म्हणत त्यांनी 5 राज्यात भाजप हरत आहे म्हणून अशी वक्तव्य केली जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच फडणवीस महाराष्ट्र द्रोही आहेत आणि मी गांधीवादी आहे, मी नौटंकीबाज नाही असंही पटोले म्हणालेत. त्याचप्रमाणे पोलिसांना चावा घेणे ही कुठली नौटंकी हे फडणवीस यांनी सांगावे असं प्रश्न उपस्थित करत, महाराष्ट्र संस्कृतील न मानणारे भाजप आहे आणि मुंबईकरांना भाजपमुळे जो त्रास झाला ते मुंबईकर विसरणार नाही अशी टीका पटोले यांनी केली.

BJP Vs Congress: nana patole slams to devendra fadnavis about modi's statement
Atul Londhe: तोंड दाबलेलं, हात पकडलेले, अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात

पटोले पुढे म्हणाले की, भाजप सरकारने कोरोना काळात जो त्रास दिला तो जनतेला माहीत आहे. आमचे सहकारी आंदोलन विरोधात नाहीत. आम्ही कायदा सुव्यस्था पाळणारे आहोत. तुमच्या उचक्याने उकणारे नाहीत असं ते म्हणाले. तसेच कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची पोलीसांकडून करण्याल आलेल्या मुस्कुटदाबी प्रकरणाबाबत ते म्हणाले की, मन की बात वाल्याचा तो पोलिसवाला असावा. अतुल लोंढे यांना ताब्यात घेतांना तोंड दाबण्यात आले, महिला भाजप कार्यकर्ती महिला पोलिसांना चावली, हा हिंसाचार नाही काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com