आता पुरुषांसाठीही बाजारात येणार गर्भनिरोधक गोळ्या! Saam Tv
देश विदेश

आता पुरुषांसाठीही बाजारात येणार गर्भनिरोधक गोळ्या!

डुंडे विद्यापीठातील शास्त्रज्ञांना बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन कडून पहिले सुरक्षित आणि प्रभावी पुरुष गर्भनिरोधक औषध विकसित करण्यासाठी 1.7 दशलक्ष डॉलर्सची मोठी रोख रक्कम देण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

डुंडे विद्यापीठातील University of Dundee शास्त्रज्ञांना बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन Bill and Melinda Gates Foundation कडून पहिले सुरक्षित आणि प्रभावी पुरुष गर्भनिरोधक औषध विकसित करण्यासाठी 1.7 दशलक्ष डॉलर्सची मोठी रोख रक्कम देण्यात आली आहे.

नवीन गर्भनिरोधक पद्धतींच्या अलीकडील प्रयत्नांना विविध कारणांमुळे अडथळा निर्माण येत होता ज्यात मानवी शुक्राणूंच्या जीवशास्त्राची human sperm biology तुलनेने कमी ज्ञान आणि अभ्यासाची कमतरता येत होती.

हे देखील पहा-

सध्या बातम्यांविषयी जागरूक असलेल्या कोणालाही, पुरुष गर्भनिरोधक गोळ्यांविषयी माहित असेल. पण अद्याप या गोळ्या उपलब्ध झाल्या नसल्या तरी, या गोळ्या प्रत्यक्षात लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ज्याप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्या स्त्रियांना अंडी बनवण्यापासून रोखतात त्याचप्रमाणे पुरुषांसाठीही ते त्याच प्रकारे काम करतील. या गोळ्या पुरुषांच्या शुक्राणूंना स्त्रीला गर्भवती बनवण्यापासून रोखणार.

डुंडे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमधील पुनरुत्पादक औषधाचे Reproductive Medicine प्राध्यापक ख्रिस बॅरेट यांनी या विकासावर बोलताना सांगितले की, "काँडमच्या विकासापासून पुरुष गर्भनिरोधकाच्या क्षेत्रात कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. याचा अर्थ असा आहे की गर्भधारण संरक्षणाचा बराचसा भार स्त्रियांवर आहे. आम्हाला आशा आहे की, त्या विषमतेचे आम्ही निराकरण करू आणि यासाठी आम्ही आधीच काम करणे सुरु केले आहे.

या दोन वर्षांच्या अखेरीस आम्ही औषधांच्या विकासाच्या पहिल्या टप्प्यात प्रगती करू उच्च दर्जाचे कंपाऊंड बनवू इच्छितो. हे या क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल असेल आणि संभाव्यतः पुरुष गर्भनिरोधकाच्या नवीन युगाची दिशा ठरवणारी असू शकते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT