3 dies after drinking acid 
देश विदेश

त्रिपुरातील धक्कादायक प्रकार! दारु समजून प्यायले ॲसिड; 3 जणांचा मृत्यू

त्रिपुरामध्ये दारू समजून चक्क अ‍ॅसिड पिल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : तुम्ही अनेकवेळा बनावट दारू पिल्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकले असतील. पण, त्रिपुरामध्ये दारू समजून चक्क अ‍ॅसिड (Acid) पिल्याची घटना घडली आहे. अ‍ॅसिड पिल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. घटना त्रिपुरातील धलाई (Dhalai) जिल्ह्यात घडली आहे. त्रिपुरा पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, एका पार्टीमध्ये ३ मद्यधुंद व्यक्तींनी दारुऐवजी चुकून अ‍ॅसिड प्यायले आहेत. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा जय पारा येथील सचिंद्र रेआंग (वय- २२), हजरधन पारा येथील अधीराम रेआंग (वय-४०) आणि नेपाळटीला भागातील भाबीराम रेआंग अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी एका पार्टी (Party) दरम्यान तिघांनी चुकून अ‍ॅसिड पिले आहेत. अ‍ॅसिड पिण्याअगोदर तिघेही आधीच दारुच्या नशेत होते.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सोमवारी रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीमध्ये ३ मृतांसह १० लोक सहभागी झाले होते. पार्टीत जास्त दारू प्यायल्यानंतर तिघांनी चुकून अ‍ॅसिड प्यायले आहेत. ते दारुच्या नशेत असल्यामुळे दारू आणि अ‍ॅसिड मधील फरक समजू शकले नाहीत. घटनेनंतर लगेच तिघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे, तेथून बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात (hospital) रेफर करण्यात आले आहे. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

SCROLL FOR NEXT