Shreya Maskar
स्ट्रीट स्टाइल पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी जिरे, धने, पुदिना , हिरवी मिरची , काळी मिरी, ओवा , आमचूर पावडर, काळे मीठ आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कैरी
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी सालासकट धुवून कुकरमध्ये उकडून घ्या.
आता थंड पाण्यात चवीनुसार मीठ, जलजिरा आणि काळे मीठ घाला.
उकडलेल्या कैरीचा पल्प या थंड पाण्यात मिक्स करा.
भाजलेले जिरे, धने, ओवा, काळी मिरी यांची पावडर करून घ्या.
दुसरीकडे मिक्सरला पुदिना, हिरव्या मिरच्या छान बारीक वाटून घ्या.
थंड पाण्यात वाटलेला मसाला आणि पुदिना पेस्ट घालून मिक्स करा.
शेवटी पाण्यात बारीक कापलेली कैरी घाला. चटपटीत पाणीपुरीचे पाणी तयार झाले.