Hyderabad Investment Scam saam tv
देश विदेश

Investment Fraud: गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीने रचला ६७० कोटींचा महाघोटाळा; ७४०० लोकांना लावला लाखांचा चुना, बिंग कसं फुटलं?

Hyderabad Investment Scam: हैदराबादमध्ये 670 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. Shares Bazaar आणि Kisaan Parivaar या दोन कंपन्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, 7400 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आणि एकेकाळी गवंडी म्हणून काम केलेला एक व्यक्ती 670 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात देशभरातील तब्बल 7,400 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.या प्रकरणी सायबराबाद पोलिसांनी हैदराबादमधील दोन कंपन्यांची चौकशी सुरू केलीये. एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने 4.51 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. आता या प्रकरणात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) आतापर्यंत 500 हून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. या गुंतवणूकदारांचे 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय.

कोणत्या दोन कंपन्यांची चौकशी सुरू?

पोलिसांकडून Shares Bazaar Pvt Ltd (SBPL) आणि Kisaan Parivaar Ltd (KPL) या दोन कंपन्यांची चौकशी सुरू आहे. या कंपन्यांचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारीही पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आहेत.

या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना 18 ते 48 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचं आमिष दाखवल्याचा आरोप आहे. Shares Bazaar Pvt Ltd ही कंपनी शेअर बाजारात अल्गोरिदमच्या मदतीने व्यवहार करत असल्याचं सांगत होती. त्याचप्रमाणे ही कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचंही गुंतवणूकदारांना सांगण्यात आलेलं.

तर Kisaan Parivaar Ltd ही कंपनी सेंद्रिय शेतीचा व्यवसाय करत असल्याचं सांगितलं जात होतं. या कंपनीने छोट्या शेतकऱ्यांकडील जमिनी एकत्र करून शेतीचा व्यवसाय उभारल्याच चित्र गुंतवणूकदारांसमोर मांडलं होतं.

सुरुवातीला व्याज दिलं नंतर पैसे देणं बंद

पोलिसांच्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्यांनी 2020 पासून गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करण्यास सुरुवात केली. 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांत या कंपन्यांमधील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना नियमित व्याज दिलं जात होतं. त्यामुळे लोकांचा कंपन्यांवरील विश्वास वाढला. अनेकांनी पुन्हा पैसे गुंतवले तर काहींनी इतरांनाही या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितलं.

परंतु ऑक्टोबर 2025 पासून गुंतवणुकीवरील व्याज आणि मूळ रक्कम परत मिळणं बंद झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांतील किमान 12 माजी लष्करी अधिकारीही फसवणुकीचे बळी ठरल्याचं समोर आलंय.

निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर तपास सुरू

या प्रकरणातील मुख्य गुन्हा 15 जून रोजी दाखल करण्यात आला. हैदराबादमधील मोकीलामध्ये राहणाऱ्या 58 वर्षीय निवृत्त नौदल कमोडोर यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. आपल्यासह आणखी 10 जणांची मिळून 4.51 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. या तक्रारीत कथित प्रवर्तक नानावत भूपाल नाईक यांच्यासह त्यांचे काही नातेवाईक आणि या कंपन्यांशी संबंधित व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत. या गुंतवणूक योजनांशी संबंधित आतापर्यंत सायबराबाद पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत.

पाच जणांना अटक

या प्रकरणातील मुख्य गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केलीये. यामध्ये भूपाल नाईक, त्यांचे काका बाबू नाईक, त्यांचे भाऊ आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष नाईक तसंच त्यांचे साथीदार शंकर राव आणि रामबाबू यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान आरोपींशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या 45 मालमत्तांची माहिती पोलिसांनी मिळवली आहे. महबूबाबाद, वनपर्थी आणि संगारेड्डी या भागांमध्ये या मालमत्ता आहेत. यामध्ये सुमारे 140 एकर शेतीच्या जमिनीचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधील कोंडापूर परिसरातील एक व्हिला आणि कार्यालयांच्या इमारतींचीही माहिती पोलिसांनी मिळवलीये. या मालमत्ता जप्त करण्यासाठी पुढील कारवाई केली जाणार आहे.

या प्रकरणात आणखी काही तक्रारी समोर आल्या आहेत. 31 जुलै रोजी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. सिकंदराबाद येथील एका निवृत्त वायुदल विंग कमांडर यांनी ही तक्रार केली होती. Kisaan Parivaar Ltd मध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपल्या कुटुंबाचे 48 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय Shares Bazaar Pvt Ltd मध्ये गुंतवणूक करून 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची आणखी एक तक्रार समोर आली. सुरुवातीला ही तक्रार गच्चीबोवली पोलिसांकडे होती. त्यानंतर ती पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आली. दरम्यान भूपाल नाईक यांना यापूर्वी पंजाब आणि गुजरातमध्येही अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूरात ऊस दराच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांचा एल्गार

Diwali Muhurat Trading: दिवाळीत मोठा धमाका! शेअर बाजारात जोरदार तेजी, मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स- निप्टीमध्ये मोठी वाढ

Govardhan Puja 2026 : सोमवार की मंगळवार, गोवर्धन पूजा कोणत्या दिवशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Kurti for Short Height Girl: कमी हाइटच्या मुलींवर खुलून दिसतील कुर्त्याच्या 'या' डिझाइन्स, दिसाल अधिक उंच आणि सुंदर!

हात-पायांना मुंग्या का येतात? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT