Virat Ramayana Temple
Virat Ramayana Temple Saam Tv
देश विदेश

जगातील सर्वात उंच 'रामायण' मंदिराचं बांधकाम ३ मे पासून; १२५ एकरात उभारणार मंदिर

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : बिहारमधील मोतिहार येथे जगातील सर्वात उंच विराट रामायण मंदिराचे (Virat Ramayana Temple) बांधकाम ३ मेपासून सुरु होणार आहे. मोतिहारी येथील कैथवलियामध्ये सर्वात उंच मंदिराचे बांधकाम पटना येथील श्री महावीर स्थान न्यासद्वारे करण्यात येणार आहे. या मंदिराचे भूमीपूजन २१ जून २०१२ रोजी आचार्य किशोर कुनाल यांच्याहस्ते झाले होते. यानंतर या मंदिरासाठी १२५ एकर जमिनीचे अधिग्रहन करण्यात आले होते.

आतापर्यंत १०० एकर जमिनीचे अधिग्रहन करण्यात आले आहे. लोकांनी स्वइच्छेने जमिनी दिलेल्या आहेत. या मंदिराची लांबी २८०० फूट तर रुंदी १५०० फूट असणार आहे. तर मुख्य मंदिर १२४० फूट लांबीचे आणि रुंदी ११५० फूट असणार आहे. या मंदिराला १८ शिखरे असणार आहेत. या मंदिरात श्रीराम, सीता, महर्षि वाल्मिकी तसेच अन्य देवतांच्या मूर्ती असणार आहेत.

रामायण मंदिरासह या ठिकाणी जगातील सर्वात मोठे शिवलिंग होणार आहे. शिवलिंगजवळ एक मोठे तवालही असणार आहे. या तलावाची उंची ८०० फूट तर रुंदी ४०० फूट आहे. या तलावाला गंगासागर हे नाव देण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सहा राज्यातून अत्याधुनिक यंत्रे मागवण्यात आली आहेत. हे मंदिर अडीच वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष आहे.(Virat Ramayana Temple)

हे देखील पाहा

रामायण मंदिरासाठी मुस्लिम परिवाराने दिली जमीन

या मंदिराच्या बांधकामासाठी एका मुस्लिम परिवाराने जमीन दान केली आहे. या जमिनीची किंमत २.५ कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. ही जमीन उद्योगपती इश्तियाक अहमद खान यांनी दिली आहे. मंदिरासाठी काहीतरी करणे आणचे कर्तव्य असल्याचे खान यांनी म्हटले आहे. (Virat Ramayana Temple)

मंदिराच्या बांधकामासाठी ५०० कोटी खर्च होणार

विराट रामायण मंदिराच्या बांधकामासाठी ५०० कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराचे बांधकाम गतीने करायचे आहे. यासाठी बाहेरच्या राज्यातून मिशन्स मागवण्यात आल्या आहेत. मंदिराचे बांधकाम कमी दिवसात पूर्ण करायचे आहे. (Virat Ramayana Temple)

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT