Anurag Thakur reply to Rahul Gandhi HT
देश विदेश

Parliament: संविधान, मनुस्मृती, सावरकर-आंबेडकर....; संसदेत काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी| Video

Anurag Thakur reply to Rahul Gandhi: भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेत राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, तुम्ही संविधान वाचवण्याचे बोलता पण उघडपणे वाचत नाही. शिखांचे गळे चिरले गेले तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. सर्वाधिक दंगली काँग्रेसच्या काळात झाल्याचं अनुराग ठाकूर म्हणाले.

Bharat Jadhav

लोकसभेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेत भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर दिलं. संविधान वाचवण्यासाठी चर्चा करणाऱ्या काँग्रेसच्या काळात शिख लोकांचे गळे कापण्यात आले होते. भाजप तरुणांच आणि गरीब लोकांचे अंगठे कापत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यावरून उत्तर देतांना भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना जोरदार टोमणा लागावलाय.

आज काँग्रेस नेते संविधान वाचवण्याच्या गप्पा मारतात आणि भाजपवर अंगठे कापल्याचा खोटा आरोप करतात. त्यांच्या पक्षाच्या राजवटीत शिखांचे गळे चिरले गेले हे ते विसरलेत का?. देशाच्या लोकशाहीचा गळा घोटून आणीबाणी लादली गेली. तेव्हा सत्तेत असलेला काँग्रेस पक्षच होता,असं भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले. अनुराग ठाकूर यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

आज तुम्ही संविधान खिशात घेऊन फिरता, पण नुसतेच हिंडून काहीही साध्य होणार नाही. मी तुम्हाला सांगतो की, संविधानाला एकदा वाचावं, जेणेकरून समजून येईल. गांधी कुटुंबियांनी आणि काँग्रेस पक्षाने संविधानाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. भाजपवर हल्लाबोल करताना राहुल गांधींना एकलव्यची कथा सांगितली होती.

त्यावरून उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले, आज हे लोक भाजपवर मनात येईल ते आरोप लावत आहेत. पण मला आठवण करून द्यायची आहे की, काँग्रेस पक्षाच्या राजवटीत शिखांचे गळे चिरले गेले. भारताच्या इतिहासात सर्वाधिक दंगली काँग्रेस पक्षाच्या राजवटीत झाल्यात. त्यांनी देशाची राज्यघटना नष्ट करण्याचे काम केले आहे. यासाठी त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे.

काय म्हणाले राहुल गांधी

भाजपवर निशाणा साधताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे मुख्य मुद्दे गांधी, कबीर, शिव, वेद पुराण आणि गुरु नानक यांच्या विचारातून घेण्यात आलेत. पण आरएसएस आणि भाजपचे प्रमुख नेते सावरकर यांनी संविधानाबाबत म्हटले होते की, भारतीय संविधानात भारतीय असे काहीही नाही.

भाजप नेत्यांना प्रश्न विचारताना राहुल म्हणाले की, आज भाजप संविधान वाचवण्याची भाषा करताहेत हे योग्य आहे. पण ते आपल्या नेत्याचे ऐकत नाही का? असं आपल्याला सांगावे. त्यांचे नेते सावरकरांचे शब्द पुन्हा सांगत आहेत? राहुलने मनुस्मृती दाखवली आणि सावरकरांना हेच लागू करायचं होतं, असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर राहुल यांनी एकलव्याची कहाणी सांगून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला होता, त्याचप्रमाणे आज भाजप तरुण आणि गरिबांचा अंगठा कापत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT