पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना लवकरच धडा शिकवणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा इशारा  SaamTV
देश विदेश

पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना लवकरच धडा शिकवणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा इशारा

राज्यपालांनी सही न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सरकारला पुढे ढकलावी लागल्याने काँग्रेसच्या हक्काची अध्यक्षपदाची जागा रिकामीच राहिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : नुकत्याच धालेल्या हिवाळी अधिवेशनामध्येही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न झाल्याने काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. राज्यपालांनी सही न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सरकारला पुढे ढकलावी लागल्याने काँग्रेसच्या हक्काची अध्यक्षपदाची जागा रिकामीच राहिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवरतीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटण्यासाठी दिल्लीला गेले मात्र काही कारणास्तव आपली भेट झाली नाही मात्र सोनियाची नाराज नाहीत असही पटोले यांनी स्प्ष्ट केलं.

दरम्यान 'पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार असल्याचा इशाराही पटोले (Nana Patole) यांनी यावेळी दिला आहे. आता पक्षाध्यक्षांनीच इशारा दिल्यामुळे पक्षातील विरोधक कोण आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. 'भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker) निवडणूक पुढे ढकलल्याचा प्रकार संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला असल्याचही ते म्हणाले.

हे देखील पहा -

तसंच पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे, अशांचा शोध घेऊन कारवाई केली जाणार असल्याचही ते म्हणाले. फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होईल आणि विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच (Congress) असंही पटोले यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मधुमेहाच्या रूग्णांनी 'ही' फळं खावीत; शुगर वाढण्याची समस्या येणार नाही

Zodiac Stones: राशीनुसार कोणते रत्न परिधान केले पाहिजे, जाणून घ्या

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

SCROLL FOR NEXT