Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: '26 FIR, लढाई सुरूच', राहुल गांधींवरील गुन्ह्यानंतर काँग्रेसची पोस्ट चर्चेत; भाजपला दिलं थेट आव्हान

FIR Against Rahul Gandhi: काँग्रेसने राहुल गांधींविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याला आदराची बाब असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने राहुल गांधींना धक्काबुक्की करतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावे असे आव्हान भाजपला केले आहे.

Priya More

Rahul Gandhi FIR: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेमध्ये केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं केली आणि त्याच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्याविरोधात गुरुवारी संसदेत इंडिया आघाडीच्या नेत्यांसह खासदारांनी आंदोलन करत जोरदार निदर्शने केली.

यावेळी भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमने-सामने आले होते. यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले. काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काँग्रेसने राहुल गांधींविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याला आदराची बाब असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, 'बाबासाहेबांच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवणे हा सन्मान आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातील त्यांच्या तीव्र निषेधाला प्रत्युत्तर म्हणून ही एफआयआर म्हणजे लक्ष विचलित करण्याची युक्ती आहे.'

केसी वेणुगोपाल यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, भाजपच्या राजकीय सूडबुद्धीमुळे राहुल गांधींना आधीच २६ एफआयआरचा सामना करावा लागत आहे आणि ही एफआयआर त्यांना किंवा काँग्रेसला आरएसएस-भाजप राजवटीच्या विरोधात उभे राहण्यापासून रोखणार नाही.' यासोबतच वेणुगोपाल यांनी दिल्ली पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसच्या महिला खासदारांनी भाजप नेत्यांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर कारवाई का झाली नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी देखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'संपूर्ण संसदेत सीसीटीव्हीचे जाळे पसरले आहे. एकही पक्ष सीसीटीव्हीत कैद झाल्याशिवाय फडफडू शकत नाही. असे असतानाही भाजपवाले खोट्यांचा किल्ला बांधत आहेत. आम्ही त्यांना आव्हान देतो की त्यांनी राहुल गांधींना धक्काबुक्की करतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावे. दूध का दूध पाणी का पाणी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT