
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. देशभरामध्ये याचे पडसाद उटत आहेत. दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आता या मुद्द्यावरून गाजत आहे. अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अमित शहांच्या वक्तव्यांचा निषेध करत काँग्रेसने आज देशभरामध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. याच मुद्द्यावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. आज दिल्लीतील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आणि महाराष्ट्रात नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात निळे वादळ पाहायला मिळाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे निळ्या साडीमध्ये आज संसदेमध्ये पोहचले. त्यांच्या ड्रेसकोडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
काँग्रेस नेते राहुल गांधी निळ्या टी-शर्टमध्ये तर प्रियंका गांधी निळ्या साडीत आज संसदेत पोहोचले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आरजेडी, डावे पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यासह जवळपास सर्व विरोधी पक्षांनी बुधवारी अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत गोंधळ घातला. संसदेच्या दोन्ही सभागृहात हा मुद्दा विरोधकांनी जोरदारपणे उपस्थित केला त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. आज देखील या मुद्द्यावरून संसदेत गोंधळाचे वातावरण आहे.
संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर इंडिया आघाडीच्या खासदारांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राज्यसभेत केलेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देखील निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसंच, हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेत भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.