Rahul Gandhi and Mallikarjun Kharge  Saam Tv
देश विदेश

Haryana Assembly Election: हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी

Satish Kengar

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत काँग्रेसने 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये सामील झालेल्या ब्रिजेंद्र सिंह यांना उचाना येथून तिकीट देण्यात आलं आहे.

तोशाममधून अनिरुद्ध चौधरी, मेहममधून बलराम डांगी, बादशाहपूरमधून वर्धन यादव, गुरुग्राममधून मोहित ग्रोवर, नांगल चौधरीमधून मंजू चौधरी, तोहानामधून परमवी सिंग, ठाणेसरमधून अशोक अरोरा यांना तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेसने आतापर्यंत दोन यादीत एकूण 41 उमेदवार जाहीर केले आहेत.

ब्रिजेंद्र सिंह हिसारमधून भाजपचे खासदार होते. मात्र लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आलं आहे. उचाना कलानमध्ये ब्रिजेंद्र सिंह यांचा सामना दुष्यंत चौटाला यांच्याशी होणार आहे. याशिवाय माजी विधानसभा अध्यक्ष कुलदीप शर्मा यांना गन्नौर विधानसभेचे तिकीट मिळालं आहे.

काँग्रेसशिवाय भाजपनेही हरियाणामध्ये आपल्या 67 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, अनिल विज आदींची नावे होती. भाजपने उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केल्यानंतर अनेक नाराज नेत्यांनी राजीनामे दिले.

दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हरियाणातील सर्व 90 जागांवर एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. याआधी मतदानाची तारीख 1 ऑक्टोबर होती, मात्र नंतर निवडणूक आयोगाने ती बदलून 5 ऑक्टोबर केली. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: लोकसभेला फटका, विधानसभेला सावध पवित्रा! शिंदे गटाचा उत्तर भारतीयांवर डोळा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा प्लॅन

Maharashtra News Live Updates: सुभाष देशमुख यांना आणखी एक राजकीय धक्का

How to Handle Saree in Dancing? : साडी नेसून मिरवणुकीत डान्स कसा करायचा? करिष्माने थेट नाचून दाखवलं, VIDEO

Sunflower Seeds Benefits: सूर्य फुलाच्या बिया खाण्याचे आश्चर्यकारक फायदे!

मोठी बातमी! आता पीएफ खात्यामधून १ लाख रुपये काढता येणार, EPFO चा नवीन नियम

SCROLL FOR NEXT