आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ४२ उमेदवार जाहीर
गौरव गोगोई यांना जोरहाटमधून उमेदवारी जाहीर
काँग्रेसने दिली तरुण आणि अनुभवी नेत्यांना संधी
ऐन धुळवडीत आसाम विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने मंगळवारी ४२ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते गौरव गोगाई यांच्या नावाचाही समावश आहे.
गौरव गोगाई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगाई यांचे पुत्र गौरव हे जोरहाट लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसने गोगाई यांना मैदानात उभे करून भाजपच्या हेमंत बिस्वा सरमायांना तगडे आव्हान दिलं आहे.
गौरव गोगाई यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवं बळ मिळाल्याची चर्चा आहे. गौरव गोगाई यांच्याकडे काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. काँग्रेसने आज मंगळवारी ४२ उमेदवार जाहीर केले. या यादीत तरुण आणि अनुभवी नेत्यांना संधी दिली आहे. दुसरीकडे गौरव गोगोई यांच्यासहित खासदार रकीबुल हसन यांनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने वरिष्ठ नेते रिपुन बोरो यांना बरचल्ला विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. सिलचरमधून अभिजीत पॉल, माजुली येथून इंद्रनील पेगु आणि दिसपूरमून मीरा बोरठाकूर गोस्वामी यांना निवडणुकीच्या रिंगणात मैदानात उतरवलं आहे. आसाममधील १२६ विधानसभा मदारसंघाच्या जागेसाठी निवडणुका होणार आहे. परंतु निवडणूक आयोगाने निवडणुकीची अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
तत्पूर्वी, आसाममध्ये एनडीए सरकार आहे. भाजपकडे एकूण ६४ आमदार आहेत. भाजपला आसाम गण परिषद, युनायटेड पिपुल्स पार्टी लिबरल आणि बोडोलँड पिपुल्स फ्रंटने समर्थन दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.