Sonia Gandhi saam tv
देश विदेश

Sonia Gandhi Mother : सोनिया गांधींच्या आईचं निधन; इटलीत घेतला अखेरचा श्वास

सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sonia Gandhi Mother : काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाले आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या आई पाओला माइनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. काल म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Sonia Gandhi Mother Passes Away)

सोनिया गांधींच्या आई पाओला माईनो मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोनिया गांधी आपल्या आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या. हा दौरा वैद्यकीय तपासणीसाठी त्यांच्या विदेश दौऱ्याचा एक भाग होता, सोनिया यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा सुद्धा इटलीला गेले होते. सोनिया अजूनही विदेशातच आहेत. (Sonia Gandhi Today News)

दरम्यान, राहुल आणि प्रियंका अनेकदा त्यांच्या आजीला भेटायला जात होते. 2020 साली राहुल गांधींच्या वारंवारच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती, तेव्हा काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. राहुल गांधी इटलीला त्यांच्या आजारी आजीला भेटायला जात असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबई मेट्रो मुंबईला जोडणार आहोत- मुख्यमंत्री

Shrikhand Puri Recipe: मकरसंक्रात सणाचा गोडवा वाढवण्यासाठी बनवा स्वादिष्ट श्रीखंड पुरी, वाचा सोपी रेसिपी

मोठी बातमी! ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा, मनोज जरांगेंचे पोस्टरद्वारे आवाहन, VIDEO

Shikhar Dhawan Engagement: शिखर धवनने गर्लफ्रेंड सोफीसोबत केला साखरपुडा; घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर गब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत

शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा; बड्या नेत्याचा पक्षाचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT