Sonia Gandhi saam tv
देश विदेश

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कोरोनावरील उपचारासाठी आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनावरील उपचारासाठी आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोनिया गांधी यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची (Corona) लागण झाली होती. आज अचानक त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली आहे.

सोनिया गांधी यांना २ जून रोजी कोरोना ची (Corona) लागण झाली, त्यांनी घरीच उपचार घेतले. दरम्यान त्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. याअगोदर ८ जून रोजी सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, पण कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी या तारखेला ईडी कार्यालयात जाऊ शकल्या नाहीत.आता ईडीने त्यांना २३ जूनला बोलावले आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधींना ईडीने २ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी राहुल गांधी भारता बाहेर होते, त्यामुळे त्यांनी ईडीकडे नवीन तारीख मागितली होती. ईडीने त्यांना १३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT