Congress President Elections Sonia Gandhi Latest Update
Congress President Elections Sonia Gandhi Latest Update SAAM TV
देश विदेश

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या हालचालींना वेग; 'हा' चर्चेतला नेता सोनिया गांधींच्या भेटीला

साम ब्युरो

Congress President Election | नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या भेटीमागील नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे या भेटीआधी काही दिवसांपूर्वी शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात, असे संकेत होते. तशी राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाली होती.

काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना २२ सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत असेल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ८ ऑक्टोबरपर्यंत असेल. एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर १७ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल घोषित केले जातील.

राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं ही गुजरात काँग्रेसची इच्छा

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसल्याचे मध्यंतरी वृत्त होते. मात्र, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. गुजरात काँग्रेसनंही रविवारी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली होती.

दुसरीकडे राजस्थान आणि छत्तीसगडमधूनही ठराव मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. गुजरातमध्ये प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही मागणी केली आहे. उपस्थित सर्व सदस्यांनी राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत या ठरावाला मंजुरी दिली.

गुजरात प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत एकमुखाने राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भारताचं भविष्य आणि युवांचा आवाज असलेल्या राहुल गांधींना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली. त्यावर सगळ्यांनी या ठरावाला पाठिंबा दर्शवला.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

Health Tips: दुधासोबत या गोष्टी खाऊ नये,आरोग्य बिघडेल

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

SCROLL FOR NEXT