Rahul Gandhi Warn Party Workers Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi Video: पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर काय कारवाई?, महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रश्नावर राहुल गांधींनी सांगितली शिकाऱ्याची गोष्ट!

Rahul Gandhi Warn Party Workers: जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना हसत खेळत दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Priya More

काँग्रेसच्या (Congress) गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. 'जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा', अशा सूचना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमध्ये पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. राहुल गांधी यांच्या या इशारानंतर राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना हसत खेळत दिला आहे. पक्षविरोधी कोणी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार? असा मुद्दा एका नेत्याने मांडला होता. या नेत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना शिकाऱ्याची गोष्ट सांगत थेट इशारा दिला आहे. सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

या चर्चेला मुंबई काँग्रेसमधील वादाची किनार होती अशी माहिती समोर आली आहे. यानंतर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रभारी रमेश चन्नीथला यांना ४ जूलैला मुंबईत जाऊन हा वाद मिटवण्याचे आदेश दिले होते. अशामध्ये आता राहुल गांधी यांनी पक्षात नेमकी काय कारवाई करणार हेच संगितले आहे. राहुल गांधी यांच्या ईशाऱ्यानंतर अध्यक्षांनी पक्षाविरोधी कारवाई कराल तर खपवून घेतलं जाणार नाही असा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT