मोठी बातमी! राहुल गांधी असणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय
Rahul Gandhi  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi Video: मोठी बातमी! राहुल गांधी असणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय

Satish Kengar

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. खासदार राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने महासचिव केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे नाव प्रोटेम स्पीकर महताब यांना पाठवण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

याआधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी करण्यात आली होती. बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी राहुल गांधी यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असा ठराव मंजूर केला होता.

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यानंतर आज त्यांना त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, मंगळवारीही लोकसभेचे कामकाज चांगलेच गाजले. सोमवारप्रमाणेच मंगळवारीही प्रोटेम स्पीकर महताब यांनी नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. मात्र आज 7 खासदारांना शपथ घेता आली नाही. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते भाग घेऊ शकणार नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitthal Maharaj Shastri Prediction : देवेंद्र फडणवीस होणार पुन्हा मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांची मोठी भविष्याणी

Raju Shinde Video: भाजपला मोठा धक्का; भाजप नगरसेवक राजू शिंदेंचा राजीनामा!

Rupali Bhosle: 'आई कुठे काय करते' अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण झालं

Healthy Cooking Oil : कोणते खाद्य तेल आरोग्यास चांगले? जाणून घ्या

Team India Victory Parade| हुश्शsss.. मुंबईवरील चेंगराचेंगरीचं संकट टळलं! टीम इंडियाच्या मुंबईतील विजयी यात्रेतील गर्दी मॅनेज करण्यात यंत्रणा फेल

SCROLL FOR NEXT