विद्यार्थी आंदोलनावरून सरकारला धारेवर धरणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.आंदोलनकर्त्यांवर खिळे असलेल्या काठीने मारहाण करण्यात आली. अनेक ठिकाणी पॅलेट गनने गोळीबार करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच अमित शाह यांनीच लाठीचार्जचा आदेश दिला. सरकारने अमित शाह यांना गृहमंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
अमित शाह हेच लाठीचार्जसाठी जबाबदार आहेत. संसदेत आपण दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूरतेचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यावर झालेला लाठीचार्जसाठी अमित शाह जबाबदार आहेत, असा आरोप केल्यानं राजनाथ सिंह, किरेन रिजिजू यांनी बोलू दिलं नाही, असेही राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.
विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत होते. त्यांच्यावर पोलीस अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅलेट गन चालवण्यात आली. टोकदार शस्त्रांचा वापर केला. काठ्यांमध्ये खिळे लावून मारहाण करण्यात आली. अल्पवयीन विद्यार्थी आणि महिलांना मारहाण करण्यात आली. ते पण अशा लोकांनी की नक्की कोण आहेत, तेच माहीत नाहीत. मी आज याच मुद्द्यावर संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला. पण मला बोलू दिलं नाही. त्यानंतर रिजिजू यांना बोलू दिलं. संरक्षण मंत्री बोलले, शिक्षण मंत्री बोलले, पण मला संधी दिली नाही.
तुम्ही माफी मागा असं मला सांगितलं, तरच बोलू दिलं जाईल, असं मला सांगितलं. त्यावर मी माफी मागणार नाही असं सांगितलं. त्यामुळे मला ही पत्रकार परिषद घ्यावी लागल्याचं राहुल गांधी म्हणाले. आम्ही प्रश्न केला, हे कुणी केलं, ते झालं कसं?
अमित शहा गृहमंत्री आहेत आणि पॅलेट गनचा वापर, सुरक्षा दलांनी केलेला वापर गृहमंत्र्यांच्या परवानगी विना होत नाहीत. आम्हीही सरकारे चालवली आहेत. आम्हाला ठाऊक आहे. अमित शाहांनी गृहमंत्री म्हणून आदेश दिला. त्यांना यातलं काही माहीत नव्हतं की लाठीमार, पॅलेट गन चालवले या शक्यता असू शकतात.
राहुल गांधींनी सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते. परंतु अमित शाह यांनी कोणतेच उत्तर दिलं नाही. मी स्वतः जखमी विद्यार्थ्यांपैकी एकाला भेटलो. ज्या लाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्या लाठ्यांमध्ये खिळे ठोकलेले होते. आज जेव्हा मी संसदेत हाच मुद्दा उपस्थित केला, तेव्हा मला बोलू दिले गेले नाही.
लोकसभा हे असे व्यासपीठ आहे, जिथे मला बोलण्याचा अधिकार आहे. तरीही मला ती संधी नाकारण्यात आली. परंतु आंदोनलात जे काही घडले, त्याची जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे. गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोणतीही 'पॅलेट गन' चालवली जात नाही. आम्ही सत्तेत होतो आणि आम्हाला सर्व काही माहित आहे. गृहमंत्र्यांनीच तो आदेश दिला असावा की त्यांना त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. परंतु सरकारनं याची जबाबदारी घेतली पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.
संसदेत आले नाहीत. लोकसभेत आले नाहीत. मोठमोठ्या गप्पा केल्या जायच्या आधी मार्केटिग करण्यात आली. पंतप्रधान एक हिरो, अमित धडाकेबाज गृहमंत्री अशा जाहिराती देण्यात आल्या. पण तेच धडाकेबाज अमित शाह लोकसभेत आले नाहीत. कारण ते दोषी आहेत. दोषी नसते तर ते २ मिनिट आले असते आणि उत्तर दिले असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.