नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असलेल्या सीजेपीच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या खासदारांची राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर, इंडिया आघाडीचे सर्वच खासदार तीस जनवरी मार्गावरील गांधी स्मृतीस्थळाकडे रवाना झाले. यासंदर्भातील माहिती राहुल गांधी यांनी काही मिनिटांपूर्वी एक्सवरील पोस्टद्वारे दिली.
नीट पेपरफुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना असं करण्यास भाग पाडलं, ज्या विद्यार्थ्यांना आम्ही गमावलं, त्यांचे स्मरण करण्यासाठी आम्ही गांधी स्मृतीस्थळाकडे जात आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या संसदभवनाकडे जाणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. त्यात जे विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी न्याय आणि जबाबदारी निश्चिततेची शांततेने मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहण्यासाठी जात आहोत. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. सर्व विरोधी पक्ष त्यांच्या आणि त्यांनी केलेल्या मागण्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.