Congress MLA Harish Singh Dhami Saam Tv
देश विदेश

Political News: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने घातला गोंधळ, शिवीगाळ करत स्टेजवरून माईक अन् खुर्च्या फेकल्या; VIDEO व्हायरल

Congress MLA Harish Singh Dhami Video: उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. स्टेजवर उभं राहून माईक आणि खुर्च्या फेकल्या.

Priya More

उत्तराखंडमध्ये एका राजकीय कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने राडा घातला. उत्तराखंडच्या पिथोरगड जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर आयोजित ऐतिहासिक जौलजीबी मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यात ही घटना घडली. धारचुलाचे काँग्रेस आमदार हरीश सिंह धामी यांनी स्टेजवर येऊन गोंधळ घातला. माईक आणि खुर्ची फेकून दिली. साऊंड सिस्टिम ऑपरेट करणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आमदाराचा रौद्रावतार पाहून उपस्थित प्रचंड घाबरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काँग्रेस आमदार हरीश सिंह धामी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळी स्टेजची तोडफोड केली. त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना भित्रा म्हटले. स्टेजवर त्यांनी तोडफोड केली आणि काही उपस्थितांना धक्काबुक्की देखील केल्याचा प्रकार घडला. पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना या घटनेत हस्तक्षेप करावा लागला. या संपूर्ण प्रकारामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर काहींनी संताप व्यक्त केला. काँग्रेस आमदाराच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी शनिवारी जत्रेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमातच काँग्रेस आमदार हरीश धामी यांनी गोंधळ घातला. हरीश धामी यांचा आरोप आहे की, त्यांना जत्रेचे अध्यक्षपद भूषवण्याची जबाबदारी देण्यात आली होती पण स्टेजवर त्यांना बोलावण्यात आले नाही. त्याचसोबत ते बोलत असताना माईक बंद करण्यात आला.

मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यानंतर काँग्रेस आमदाराने नाराजी व्यक्त केली. त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी माईक फेकून दिला. त्यानंतर ते साऊड सिस्टिम ऑपरेटरच्या दिशेने गेले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि मंचावरून खुर्च्या फेकल्या. त्यांच्या समर्थकांनीही मंचावर येत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली.

या गोंधळदरम्यान काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी धामी यांना भित्रा आणि पळपुटा म्हटले आणि धारचुला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. २०२२ च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असा आरोप देखील त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 2029 नाशिकमध्ये बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका, कांद्यावर करपा रोगाचा प्रार्दुभाव

Accident News : विठुरायाच्या दर्शनाला जाताना वाटेत काळाने गाठले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावूनही त्वचा कोरडी पडत असेल तर काय करावे? 5 घरगुती उपाय करून पाहा

Good News: गुड न्यूज! मुंबईवरून कोकणात जा थेट विमानाने, फक्त १ तासांत पोहचा सिंधुदुर्गला; आठवड्यातील सात दिवस करा प्रवास

Theatres : मंत्री गणेश नाईकांची मोठी घोषणा! नाना पाटेकर यांच्या नावे नवी मुंबईत उभारणार नाट्यगृह

SCROLL FOR NEXT