राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांसंबंधीच्या एक्झिट पोलचे निकाल गुरुवारी संध्याकाळी घोषित करण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये निवडणुकीचा काय निकाल लागू शकतो याचा अंदाज एक्झिट पोलमधून समोर आला आहे. यातच एका एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
News 24- Today's Chanakya च्या एक्झिट पोलमध्ये, काँग्रेस बहुमताचा 100 चा आकडा पार करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला 101, भाजपला 89 आणि इतरांना 9 जागा मिळताना दिसत आहेत. या एक्झिट पोलच्या निकालांमधून कोणता संदेश मिळत आहे, राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर त्याची काय कारणे असू शकता, हे जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. राजस्थानमध्ये प्रथा बदलेल?
राजस्थानमध्ये गेल्या 30 वर्षांपासून सत्ता परिवर्तनाचा ट्रेंड आहे. एक्झिट पोलचे निकाल योग्य ठरले तर यावेळची प्रथा बदलेल, असे News 24- Today's Chanakya मध्ये दिसत आहे. अशोक गेहलोत यांची जादू चालेल आणि ते इतिहास घडवतील. त्यांचा जनतेवर असलेला विश्वास कायम राहील, असं यातून दिसत आहे. मात्र असं दिसत असलं तरी 3 डिसेंबरलाच खरं चित्र कळू शकले. (Latest Marathi News)
2. लोकांनी सत्ताविरोधी लाट नाकारली?
अशोक गेहलोत सरकारच्या सर्व योजनांवरून स्थानिक आमदारांमध्ये नाराजी होती, मात्र असे असतानाही काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण हे मुद्दे भाजपला हवे तसे लावून धरता आले नाही, म्हणून निकाल त्यांच्या विरोधात जाऊ शकतात, असं News 24 ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
3. गेहलोत-पायलट गटबाजी, मात्र कार्यकर्त्यांमध्ये विश्वास
काँग्रेस सरकारमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेदामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र कार्यकर्ते एकसंध राहिले. अशोक गेहलोत-सचिन पायलट यांना एका व्यासपीठावर आणून काँग्रेस हायकमांडने सकारात्मक संदेश दिला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात फारशी वक्तव्ये केली नाहीत. गेहलोत यांच्यासह सचिन पायलट यांनी निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला.
4. गेहलोत सरकारच्या योजना
गेहलोत सरकारच्या अनेक योजना लोकांसाठी फायदेशीर ठरल्याचं दिसत आहे. स्थानिक आमदारांबद्दल थोडी नाराजी असली तरी गेहलोत यांच्याबद्दल मतदारांमध्ये रोष नसल्याचं या निवडणुकीत दिसलं. काँग्रेसच्या महिलांवर आधारित निवडणूक प्रचाराचाही यात मोठा सहभाग मानला जाऊ शकतो. काँग्रेसच्या ‘चिरंजीवी’, स्वस्त सिलिंडर, मोफत वीज, स्कूटर, मोबाइल यासारख्या योजनांचाही यात मोठा वाटा आहे. सरकारी कर्मचार्यांमध्ये जुनी पेन्शन योजना (OPS) देखील मोठी भूमिका बजावते, ज्यामुळे राज्यात पुन्हा काँग्रेस सरकार येऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
5. भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
भाजपने वसुंधरा राजे यांना बाजूला केले नाही, परंतु त्यांना मुख्यमंत्री चेहराही घोषित केला नाही. अनेक नेत्यांची तिकिटे रद्द झाली. जाट, राजपूत, गुर्जर आणि ब्राह्मण यांचीही मते भाजपच्या बाजूने जाताना दिसत असली तरी एकूण मतांची टक्केवारी काँग्रेसच्या बाजूने जात आहे. काँग्रेसला एससीची 58 टक्के, मीना-एसटीची 46 टक्के आणि मुस्लिमांची 83 टक्के मते दिसत आहेत. एकूणच राजस्थानमध्ये भाजपला गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळताना दिसत असल्या तरी बहुमताचा आकडा गाठता त्यांना अडचण येताना News 24- Today's Chanakya च्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.