Vijay Wadettiwar News Saam tv
देश विदेश

Vijay Wadettiwar News: 'कांदा परवडत नसेल, तर खाऊ नका' मंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्यावर वड्डेटीवार संतापले; म्हणाले...

Vijay Wadettiwar News: 'तेल-साखर महाग झालं तर खाणे बंद करावं आणि उपाशी मरावं, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

Vijay Vadettiwar News: केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. याचदरम्यान, मंत्री दादा भुसे यांनी 'कांदा परवडत नसेल, तर खाऊ नका, असं वक्तव्य केलं. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'तेल-साखर महाग झालं तर खाणे बंद करावं आणि उपाशी मरावं, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत वड्डेटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वड्डेटीवार यांनी मंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

वड्डेटीवार म्हणाले,'उद्या हे कांदा महाग झाला खाऊ नका म्हणतील तेल महाग झालं तर तेल घेऊ नका. साखर महाग झाली तर साखर खाऊ नका म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पोटभर खावं आणि जो गरीब आहे, मध्यम वर्गीय आहे यांनी मात्र महाग झालं खाणे बंद करावं आणि उपाशी मरावं. अशी जर सरकारची भूमिका असेल तर जनतेने यांना धडा शिकवण्याची गरज आहे'. या संदर्भात कॉंग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्याने यावरून विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच कांदा निर्यात शुल्कावर भाष्य करताना वड्डेटीवर म्हणाले, 'गेल्या वर्षी जाहीर केलेले 350 रूपये कांदा अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही.लहरी पद्धतीने सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे कांद्याचे दर १० ते १२ रुपयांवर आले आहे'.

'बांग्लादेशाच्या सीमेवर शुल्क वाढल्यामुळं हजारो टन कांदा पडला आहे. बाजार समित्या ओसाड आणि बंद पडल्या आहेत. कांदा उत्पादकांसंदर्भात सरकार गंभीर नाही, अशी टीका वड्डेटीवार यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: टेम्पो रिव्हर्स घ्यायला गेला अन् पाण्यात उलटला, आगरदांडा जेट्टीवरचा व्हिडीओ व्हायरल!

Health Tips: कफ काही केल्या बरा होत नाही करा 'हे' उपाय

Acharya Chanakya: दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी आचार्य चाणाक्यांचे 'हे' नियम पाळा

Rahul Gandhi : नागपुरात येऊन राहुल गांधींचं आरएसएसला आव्हान, संविधान सन्मान संमेलनात हल्लाबोल, काय म्हणाले?

Stroke: चेहरा तिरकस होणं, तोल जाणं...; स्ट्रोकची लक्षणं तुम्हाला माहितीये का? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT