Rahul Gandhi Latest News In Marathi SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi Latest News: 'संपूर्ण भारत माझं घर'; सरकारी बंगला पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

Rahul Gandhi News: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. यानंतर आता राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला देखील मिळाला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला मिळाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा प्रशासनाकडून राहुल गांधी यांना मंगळवारी तुघलक लेनवरील बंगला देण्यात आला आहे. राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांना २२ एप्रिल २०२३ रोजी १२ तुघलक लेन येथील बंगला रिकामा करावा लागला होता.

त्यानंतर आता न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा तोच सरकारी बंगला पुन्हा मिळाला आहे. सरकारी बंगला पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'संपूर्ण भारत माझं घर आहे, अशा मोजक्या शब्दात राहुल गांधी यांनी सरकारी बंगला मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

बंगला रिकामा करताना राहुल गांधी काय म्हणाले होते?

१२, तुघलक लेन येथील बंगल्यात राहुल गांधी गेल्या १९ वर्षांपासून राहत होते. बंगला रिकामा करताना राहुल गांधी म्हणाले होते की, 'मला खरं बोलण्याची किंमत मोजावी लागली'.

राहुल गांधी यांना बंगला का रिकामा करावा लागला?

सूरत कोर्टाने २४ मार्च रोजी मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचं खासदारकी रद्द केली होती. त्यामुळे त्यांना बंगला रिकामा करावा लागला होता. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

राहुल गांधी यांची कर्नाटकातील कोलार येथे १३ एप्रिल २०१९ रोजी रॅलीत म्हणाले होते की, 'नीरव मोदी, ललित मोदी , नरेंद्र मोदी यांचं आडनाव सारखं का आहे? सर्व मोदी आडनावाची माणसं चोर का असतात? असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. यानंतर माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT