Radhika Kheda Resignation From Congress:  Saamtv
देश विदेश

Radhika Khera Resign: श्रीराम मंदिराचे दर्शन घेतल्याने पक्षातून विरोध.. काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा!

Radhika Khera Resignation From Congress: राधिका खेडा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहलेल्या पत्रामध्ये गंभीर आरोप करताना राममंदिराला भेट दिल्यामुळे विरोधाचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे.

Gangappa Pujari

दिल्ली|ता. ६ मे २०२४

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी हा निर्णय घेतला असून पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राधिका खेडा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहलेल्या पत्रामध्ये गंभीर आरोप करताना राममंदिराला भेट दिल्यामुळे विरोधाचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षसदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. याबाबत एक्स माध्यमावर पोस्ट करत याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी "आज मी अत्यंत दुःखाने पक्षाचे सदस्यत्व सोडत आहे आणि माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मी एक मुलगी आहे आणि मी लढू शकते, आणि मी आता तेच करत आहे. मी माझ्या आणि माझ्या देशवासीयांच्या न्यायासाठी लढत राहीन, असे म्हटले आहे. तसेच याबाबत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहलेल्या पत्रामध्ये त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

"प्राचीन काळापासून धर्माची साथ करणाऱ्यांना विरोध करण्यात येतो. हिरण्यकशिपूपासून ते रावण आणि कंसापर्यंत अनेक उदाहरणे आहेत. प्रभू श्रीरामाचे नाव घेणाऱ्यांना काही लोक विरोध करत आहेत. मात्र प्रत्येक हिंदुसाठी श्री राम जन्मभूमी पवित्र स्थान आहे. मी ज्या पक्षामध्ये २२ वर्ष काम केले, त्याच पक्षात विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कारण मी राम मंदिरात जाण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कार्यालयात माझ्यासोबत घडलेल्या घटनेत मला न्याय देण्यास नकार दिला. मी नेहमीच इतरांच्या न्यायासाठी प्रत्येक व्यासपीठावरुन लढले आहे. पण जेव्हा स्वतःच्या न्यायाचा प्रश्न आला तेव्हा मला पक्षात पराभव पत्करावा लागला. एक स्त्री म्हणून मी खूप दुखावले आहे. पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना वारंवार कळवूनही न्याय न मिळाल्याने वेदनेतून मी हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पैसे देऊन आमचे नेते फोडले', भाजप नेत्यावर शिंदेंचा आरोप; अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नीतीश कुमारांसह २५ मंत्री घेणार शपथ

Dink Ladoo Benefits: हिवाळ्यात डिंक लाडू खाल्ल्याने काय फायदा होतो?

Pune : ससून रुग्णालयातून भाजप नेत्याचे सासरे गायब, २ महिन्यांपासून शोध सुरू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: भाजपनंतर राष्ट्रवादीकडून आरोपीला उमेदवारी, तुरूंगातून लढवणार नगराध्यपदाची निवडणूक

SCROLL FOR NEXT