prithviraj chavan demands amit shah resignation 
देश विदेश

हिंसाचाराची जबाबदारी स्विकारात अमित शहांनी राजीनामा द्यावा

Siddharth Latkar

सातारा : आसाम आणि मिझोरमच्या Assam Mizoram सीमावर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्विकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. (congress-leader-prithviraj-chavan-demands-resignation-of-home-minister-amit-shah-assam-mizoram-sml80)

सोमवारी आसाम पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक व गोळीबार झाला. या घटनेत पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर (पुणे) Vaibhav Nimbalkar हे जखमी झाले तर त्यांचे दोन सुरक्षारक्षक पोलिसांसह काही पोलिसांचा मृत्यु झाला आहे. या घटनेचा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करीत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची prithviraj chavan demands amit shah resignation मागणी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटमध्ये आसाम आणि मिझोरमच्या assam mizoram सीमावर्ती भागात सातत्याने संघर्ष हाेत आहे. त्यातून हिंसाचार घडत आहे. पूर्वोत्तर भागामधील शांतता भंग हाेऊ लागली आहे. प्रथमच दोन्ही राज्यांच्या पोलिस दलांनी एकमेकांवर गोळीबार केला. त्यात काहींना गंभीर इजा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी तातडीने आंतरराज्य कौन्सिलची बैठक बोलावणे आवश्यक आहे असे आमदार चव्हाण यांनी नमूद केले आहे. या भागातील शांतता पूर्ववत करणे आवश्यक आहे. या चकमकीत जखमी झालेल्या आसाममधील पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर superintendent of police vaibhav nimbalkar injured in assam mizoram riots यांच्या आणि इतर पोलिस कर्मचारी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करीत असल्याचे आमदार चव्हाण यांनी नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT