Adhir Ranjan Chowdhary Saam TV
देश विदेश

Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेसला मोठा दिलासा; खासदार अधीर रंजन चौधरी यांचं लोकसभेतील निलंबन रद्द

Adhir Ranjan Chowdhury: संसदेच्या विशेषाधिकार समितीने काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे

Vishal Gangurde

Adhir Ranjan Chowdhury Parliament Suspension :

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संसदेच्या विशेषाधिकार समितीने काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अधीर रंजन चौधरी यांना पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. (Latest Marathi News)

आज काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी विशेषाधिकार समितीसमोर त्यांनी त्यांची बाजू मांडली. भाजपचे खासदार सुनील सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विशेषाधिकार समितीसमोर अधीर रंजन चौधरी यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याच्या हेतू नव्हता, असे सांगितले .

वृत्त संस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, संसदेतील विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन रद्द करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन का केलं होतं?

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली होती. चर्चेदरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य केलं. यामुळे अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर सदर विशेषाधिकारी समितीपर्यंत पोहोचलं होतं. या प्रकरणावर समितीने १८ ऑगस्ट रोजी विचार केला होता. त्यानंतर यानंतर या समितीने अधीर रंजन चौधरी यांना तोंडी साक्ष देण्यासाठी ३० ऑगस्ट २०२३ रोजी बोलावलं होतं.

दरम्यान, याआधी देखील अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन झालं होतं. अधीर रंजन चौधरी यांचे अनेकवेळा संसदेत त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना निलंबन व्हावं लागलं होतं. यावेळी लोकसभेत अंधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

तर राज्यसभेत आम आदमी पक्षाचे संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांना निलंबित करण्यात आले. तर संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये मान्सुन पुन्हा सक्रिय

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

VIRAL VIDEO: ३ लाख रूपयांत ट्रेनचा कोच बुक केला अन् केली पूजा; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Rain Alert : राज्यात २१ जुलैनंतर जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? वाचा

मिटिंगसाठी फ्लॅटवर नेलं अन् बलात्कार केला; युवा नेत्याचे धक्कादायक कृत्य, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT