ladki bahin yojana  Saam tv
देश विदेश

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये दारूचे सेवन वाढलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत,VIDEO

congress leader on ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसने मध्य प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरूनही काँग्रेसने निशाणा साधला.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांचं मोठं विधान

लाडकी बहीण योजनेवरून मध्य प्रदेश सरकारवर हल्लाबोल

मध्य प्रदेशातील महिलांमध्ये दारूचे सेवन वाढल्याचा पटवारी यांचा आरोप

बेरोजगारी आणि ड्रग्सच्या धंद्यावरून मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर टीका

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशातील महिला सर्वाधिक दारूचे सेवन करतात. लाडकी बहीण योजनेच्या नावावर मत मागितले.. आता त्याच लाडक्या बहिणी नशेच्या आहारी गेल्या आहेत. देशात सर्वाधिक दारुचा खप हा मध्य प्रदेशात होतो, असं म्हणत काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी टीका केली.

जीतू पटवारी यांनी पुढे म्हटलं की, 'ड्रग्स प्रकरणात मध्य प्रदेशने आता पंजाबलाही मागे टाकलं आहे'. मध्य प्रदेशातील परिस्थितीला पटवारी यांनी मुख्यमंत्री मोहन यादव आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना जबाबदार ठरवलं.

'तुमचा मुलगा बेरोजगार आहे. तो नशा करतोय. यासाठी भाजप, मुख्यमंत्री मोहन यादव, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान दोषी आहेत. संपूर्ण देशात मध्य प्रदेशातील महिला सर्वाधिक दारूचे सेवन करतात, असा आरोप काँग्रेस नेते पटवारी यांनी केला.

जीतू पटवारी यांनी पुढे म्हटलं की, सर्वाधिक दारुचा खप हा मध्य प्रदेशमध्ये होतो. ड्रग्सचा बेकायदेशीर व्यवसायही मध्य प्रदेशात वाढू लागलाय. मध्य प्रदेशात सर्वाधिक कुपोषित आणि गरीब देखील आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांच्या वक्तव्याचा भाजपने समाचार घेतला. भाजप प्रवक्ते अजय सिंह यादव यांनी म्हटलं की, 'जीतू पटवारी मध्य प्रदेशच्या महिला दारुचे सेवन करत असल्याचे सांगून त्यांचा अपमान करत आहेत. अशा व्यक्तीला काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पद सोपवलं आहे. त्यांनी महिलांचा मोठा अपमान केला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मध्य प्रदेशातील महिला त्यांना कधीही माफ करणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag: अर्जुन-सायलीला मारायचा महिपतचा डाव; ठरलं तर मग मालिकेत येणार थरारक ट्विस्ट

Indian Cricket Team Sponsor: BYJU’S ते Dream11, टीम इंडियाच्या स्पॉन्सर कंपन्यांना का लागतं ग्रहण? स्पॉन्सर करणं खरंच शापित आहे का?

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाके जालन्यातील वडिगोद्री येथून शिर्डीच्या दिशेने रवाना

Shalarth ID Scam: बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ६८० शिक्षकांना अटक होणार? VIDEO

Maharashtra Politics : ठाकरे गटाला झटका! शिवसेनेशी ३७ वर्ष एकनिष्ठ असलेल्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT