Congress leader Himani Narwal Murder case  Saam Tv News
देश विदेश

Himani Narwal Murder : शारीरिक संबंध अन् व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; हिमानी नरवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Himani Narwal Murder Case Updates : सचिन आणि हिमानी एकमेकांना एक ते दीड वर्षांपासून ओळखत होते. सचिन हिमानीच्या घरी नेहमी येत जात राहायचा. बऱ्याचदा तो तिथे मुक्कामासाठी देखील राहिल आहे.

Prashant Patil

दिल्ली : दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचा तपास करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ३६ तासांच्या आत बहादुरगड येथील रहिवासी सचिन याला अटक केली. आरोपीकडून धक्कादायक खुलासे करण्यात आले असून तो मोबाईलच्या दुकानाचा मालक आहे. पोलीस चौकशीतून हे स्पष्ट झालं की, हिमानी आणि सचिन हे रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी आरोपीकडून हिमानीचे दागिने आणि फोनही जप्त केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी एकमेकांना एक ते दीड वर्षांपासून ओळखत होते. सचिन हिमानीच्या घरी नेहमी येत जात राहायचा. बऱ्याचदा तो तिथे मुक्कामासाठी देखील राहिल आहे. सचिनचे अगोदरच लग्न झाले होते आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक हिमानीचा मृतदेह बस स्टँडवर एका बॅगमध्ये आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

सचिन आणि हिमानी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. तिने सचिनला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध निर्माण झाले. धक्कादायक बाब म्हणजे, याचा व्हिडीओ हिमानी हिने बनवला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून ती सचिनला ब्लॅकमेल करत होती. तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम सचिनने हिमानीला दिली होती. ती आपल्यावर पैशांसाठी सतत दबाव टाकत असल्याचे पोलिसांना सचिनने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT