Congress Leader and Businessman Shot Dead Saam
देश विदेश

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Congress Leader and Businessman Shot Dead: दिल्लीतील मालवीय नगरच्या पार्कमध्ये लखपत सिंह कटारिया यांच्यावर गोळीबार. हल्लेखोर फरार. पोलिसांकडून तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • दिवसाढवळ्या गोळीबार.

  • कटारिया व्यावसायिक अन् काँग्रेस पक्षाशी संबंधित.

  • पोलिसांकडून तपास सुरू.

दिल्लीतील मालवीय नगरमध्ये भीषण हत्येची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यावसायिकाची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. व्यावसायिक हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. मारेकऱ्यांची ओळख पटली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लखपत सिंह कटारिया (वय वर्ष ५५) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. डीसीपी अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवीय नगरमधील बेगमपूर येथील रहिवासी लखपत सिंह कटारिया हे उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. हल्लेखोरांनी त्यांना आधी क्रिकेट बॅटने मारहाण केली. नंतर चार गोळ्या झाडून फरार झाले. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कटारिया यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कटारिया यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी दुचाकीवरून रेकी केली होती. आरोपींना कटारिया पार्कमध्ये येण्याती वेळ माहिती होती.

पार्कचे सुरक्षा रक्षक देवेंद्र यांनी सांगितले की, २ अज्ञात व्यक्ती पार्कमध्ये आले. कटारिया यांना मारहाण करू लागले. आरोपींनी कटारिया यांना बॅटने मारहाण करू लागले. मारहाणीनंतर एकानं पिस्तूल बाहेर काढली. तसेच कटारिया यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलीस पार्कबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासात आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OG Box Office: पवन कल्याण आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम; दोन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये एंट्री

Maharashtra Live News Update: जळगाव जिल्ह्यात विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

सरसकट कर्जमाफी द्या, पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी|VIDEO

Delhi Tourism : दिल्लीतील 'हे' ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांचे आकर्षण, सुट्टीत येथे ट्रिप प्लान कराच

Cobra Snake Video: पैसे अन् दागिने ठेवलेल्या तिजोरीत घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून थरकाप उडेल

SCROLL FOR NEXT