BJP-Congress  Saam Tv
देश विदेश

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

Vishal Gangurde

नवी दिल्ली : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघानंतर इंदूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सूरतनंतर इंदूरमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यानंतर काँग्रेस उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. कैलाश विजयवर्गीय यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गुजरातनंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेतला आहे. बम यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या मार्गावर भाजपचे वरिष्ठ नेते कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबत माहिती दिली.

विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासोबत सेल्फी शेअर केला. 'इंदूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये स्वागत आहे, असं ट्विट करत विजयवर्गीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. २९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भाजपने काँग्रसच्या उमेदवाराला गळाला यश लावण्यास यश मिळालं आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ही ४ जूनला संपन्न होणार आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी २४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बम यांची एकूण ५७ कोटींची संपत्ती आहे. ते १४ लाख रुपयांचं घड्याळ घालत असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी ८.५० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर ४६.७८ स्थावर मालमत्ता आहे. ते व्यावसायिक असून त्यातून २.६३ कोटी रुपयांची कमाई करता. त्यांच्याकडे ४१ किलो चांदी आहे. तर २७५ ग्रॅम सोने आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT