वृत्तसंस्था : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत (CM Harish Rawat) यांच्या सुरक्षिततेमध्ये मोठी चूक झाली आहे. रावत काशीपूर येथे एका सभेमध्ये असताना एक व्यक्ती सुरा (Knife) घेऊन थेट स्टेजवर आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पण यावेळी स्टेजवर आणि आसपास उपस्थित असणाऱ्या काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. तसेस हल्ला (Attack) करणाऱ्या व्यक्तीने 'जय श्री रामच्या यावेळी घोषणा दिले आहेत. पोलीस (Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे देखील पहा-
माजी मुख्यमंत्री हरीश रावत एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. याठिकाणी जाहीर सभा संपल्यावर अचानक एक व्यक्ती चाकू घेऊन स्टेजवर आला आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी संबंधित व्यक्तीला स्टेजवरून खाली उतरवून त्याच्याकडील सुरा आपल्या जवळ घेत त्या आरोपीला (accused) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हरीश रावत प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरिता आले होते. यावेळी भाषण संपल्यानंतर रावत स्टेजवर आपल्या खुर्चीवर जाऊन बसले आहे.
अचानक एक व्यक्ती स्टेजवर पोहोचला. स्टेजवर आल्यावर त्याने माईकवरून जय श्री रामच्या घोषणा देण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याची अडवणूक करत माईक बंद केला. संतापलेल्या आरोपीने अचानक आपल्या जवळ असलेले चाकू काढला. तसेच जय श्री राम न बोलल्यास जीवे मारण्याची धमकी देत मंचावर मोठा गोंधळ घातला आहे. दरम्यान काँग्रेस नेते प्रभात साहनी यांच्याबरोबर अन्य कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पकडून त्याच्या जवळील चाकू ताब्यात घेतला आहे. ही प्रशासनाची मोठी चूक असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत बुधवारीच एक मोठी चूक झाली होती. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित मोठी रॅली होणार होती. पण निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाने मोदींचा ताफा रस्त्यामध्ये थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास १५ ते २० मिनिटे मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्वात मोठी चूक असल्याचे गृह मंत्रालयानी यावेळी सांगितले आहे. यादरम्यान काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. त्यादरम्यानच आता परत एकदा अशी धक्कादायक घटना घडली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.