Bihar Election  Saam tv
देश विदेश

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Bihar Election update : बिहार निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने काँग्रेस पक्षाची साथ सोडली आहे.

Vishal Gangurde

बिहार निवडणुकीत काँग्रेसला धक्का

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बच्चू प्रसाद बीरू यांनी राजीनामा दिला

तिकीटवाटपावरून काँग्रेसचे नेते बच्चू बीरू यांचा राजीनामा

बिहार निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका

बिहार निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. सर्व पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र झाले आहेत. बिहार निवडणुकीच्या या धामधुमीदरम्यान काँग्रेसपक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तिकीटवाटपावरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,छपराचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बच्चू प्रसाद बीरू यांनी पक्षाच्या पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तिकीटवाटपावरून नाराज झाल्यानंतर बीरू यांनी निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ऐन निवडणुकीत बीरू यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

बीरू यांनी काँग्रेसचे प्रदेशध्यक्षांना पत्र लिहित म्हटलं की, इंडिया आघाडीत काँग्रेससोबत भेदभाव होत आहे. सारण सारख्या महत्वाच्या जिल्ह्यात काँग्रेसला जागावाटपात योग्य स्थान मिळालं नाही'. बीरू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून मनातील खंत बोलून लागवली आहे.

बीरू यांनी पत्र लिहित म्हटलं आहे की, 'सारण जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या दहा मतदारसंघात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. २०२० साली देखील अशीच परिस्थिती होती.आता २०२५ साली देखील काँग्रेस पक्षाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे.

बीरू यांनी म्हटलं पुढे आहे की, 'काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयाने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये नाराजी आहे. इंडिया आघाडीने यंदा दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांचा हिरमोड केला आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या वर्गात नाराजी आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT