Congress Gaurav Gogoi On NEET-UG 2024 Scam Saam TV
देश विदेश

NEET-UG 2024 Scam: NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

Congress on NEET-UG 2024 Scam: नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या कथित फेरफार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Satish Kengar

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET-UG) 2024 मध्ये झालेल्या कथित फेरफार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी पुन्हा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला त्यांनी २४ जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला जाईल, असे सांगितले.

गोगोई म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीबीआयने करायला हवा, पण सरकार त्यासाठी तयार नसेल तर तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवा.

याआधी गुरुवारी, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, 1,563 नीट परीक्षेतील उमेदवारांना ग्रेस गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्या विद्यार्थ्यांना 23 जून रोजी पुन्हा परीक्षेचा पर्याय दिला जाईल. केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) वकिलांनी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीतील खंडपीठाला सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहेत, त्यांना पुन्हा परीक्षेचा पर्याय दिला जाईल. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीटमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप फेटाळून लावला आणि याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले.

काँग्रेस खासदार गोगोई यांनी पत्रकारांना सांगितले की, "संपूर्ण देश निवडणूक निकालांवर लक्ष केंद्रित करत असताना 4 जून रोजी नीटचा निकाल का जाहीर करण्यात आला, हे एक रहस्य आहे. यावरून असे दिसून येते की, त्यांना यावरून वाद होऊ शकतो, याची कल्पना होती."

गोगोई म्हणाले, "म्हणूनच आम्हाला या संपूर्ण घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी हवी आहे. कारण हा 24 लाख तरुणांच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhwar che Upay: बुधवारच्या दिवशी करा फक्त 'ही' 6 कामं; नशीब चमकून घरात होणार पैशांचा पाऊस

Maharashtra Live News Update: खराडी रेव्ह पार्टी प्रकरण, प्रांजल खेवलकर यांच्या जामीनासाठी वकिलांकडून अर्ज

Jio Recharge Offer: जिओ ₹९४९ vs ₹९९९ Plan, जिओचे टॉप प्लॅन फायदे जाणून घ्या

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा इशारा

FASTag Pass: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! ३००० रुपयांचा पास अन् वर्षभर मोफत प्रवास, या अ‍ॅपवर करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT