Tamil Nadu politics saam tv
देश विदेश

Tamil Nadu politics: तमिळनाडूमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; थलापती विजय यांच्या TVK कडून सत्तास्थापनेच्या हालचाली, काँग्रेसनं नवा डाव टाकला

DMK alliance break: अभिनेते थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या विजयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालीये. काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता सरकार स्थापनेच्या हालचाली वेगात सुरू झाल्यात.

Surabhi Jayashree Jagdish

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते थलापती विजय यांच्या टीव्हीके (TVK Party) ने जोरदार मुसंडी मारत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्याचवेळी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी नवा डाव टाकला आहे. काँग्रेस नेत्यांनी चेन्नईत टीव्हीकेच्या मुख्यालयात जाऊन थलापती विजय यांची भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देत असल्याचं पत्र विजय यांच्याकडे दिलं.

सत्तास्थापनेसाठी तमिळनाडू काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा टीव्हीकेला पाठिंबा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. याबाबत तमिळनाडू काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तास्थापनेसाठी आमचा पाठिंबा असल्याचं पत्र टीव्हीकेला दिलं आहे. हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा कधी होणार आहे, याबाबत कल्पना नाही. टीव्हीकेचे प्रमुख विजय हे लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सेल्व्हापेरूनथगई के यांनी दिली.

तामिळनाडू काँग्रेस समिती आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाने (सीएलपी) त्यांचा पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जातंय. टीव्हीके प्रमुख विजय यांनी काँग्रेस शिष्टमंडळाचं स्वागत केलं. त्यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंब्याचं पत्र सादर केलं.

सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना धूळ चारून विजय यांच्या टीव्हीके पक्षानं 'न भूतो... असं यश मिळवलं आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीके पक्ष उदयाला आला आहे. टीव्हीके पक्ष स्पष्ट बहुमतापासून दूर असला तरी, त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्याचवेळी टीव्हीके पक्षाला कोणता पक्ष पाठिंबा देणार यासाठी अहमहमिका लागली आहे. दुसरीकडे टीव्हीकेच्या मुख्यालयात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जाऊन सरकार स्थापनेसाठी विजय यांना पाठिंबा दिला आहे. या सर्व घडामोडींनंतर विजय हे पक्ष मुख्यालयातून बाहेर पडले असून, लवकरच ते राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसने म्हटलंय की, टीव्हीकेसोबतची त्यांची युती केवळ या सरकारच्या स्थापनेसाठीच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेच्या भविष्यातील निवडणुकांसाठीही आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला पाठिंबा देऊनही काँग्रेस केंद्रातील इंडिया ब्लॉकमध्ये डीएमकेसोबत राहू शकते.

काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडंकर म्हणाले, टीव्हीकेसोबत आमची एकच अट आहे की, या युतीमध्ये भाजपच्या कोणत्याही मित्रपक्षाचा समावेश नसावा. आम्ही डीएमकेसोबतच इंडिया ब्लॉकमध्ये राहू.

टीव्हीकेला काँग्रेसचं समर्थन

काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला आपला पाठिंबा अधिकृतपणे जाहीर केला होता. काँग्रेस आणि तामिळनाडू काँग्रेस समिती यांच्यातील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडंकर यांनी एक प्रेस रिलीज जारी करून सांगितलं की, टीव्हीकेचे अध्यक्ष थलापती विजय यांनी काँग्रेसकडे औपचारिकपणे पाठिंबा मागितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोन गटात वाद; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday Horoscope: कामाच्या ठिकाणी सावध राहा, ५ राशींना कुटुंबाचा पाठिंबा मिळणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Raigad : रायगडच्या किनाऱ्यावरील भक्कम सागरी किल्ला, 'येथील' ऐतिहासिक वैभव पाहताच डोळे दिपतील

माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत FIR; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Mumbai Crime: मुंबईत ड्रग्ज फॅक्ट्री उद्ध्वस्त, ५०.७४ कोटींचा मेफेड्रॉनचा साठा जप्त; कोण आहे मालक?

SCROLL FOR NEXT