काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या बहुचर्चीत 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा रविवारपासून सुरू झाला. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असं नाव देण्यात आलं आहे. इंफाळमध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू होण्यास उशीर झाल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली. दिल्लीतील खराब हवामानामुळे आमच्या विमानाला उशीर झाला, त्यासाठी मला माफी मागायची आहे. मोदींना मणिपूरचं वेदना दिसत नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देत नसल्याची टीका त्यांनी केली.
मणिपूरमधील खोंगजोम वॉर मेमोरियल येथून आज भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली. यापूर्वी राजधानी इंफाळपासून सुरुवात होणार होती. यात्रेदरम्यान राहुल गांधी 60 ते 70 प्रवाशांसह पायी आणि बसने प्रवास करणार आहेत. दोन महिने चालणाऱ्या या यात्रा काळात राहुल गांधी 6700 किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेची सांगता होणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संपूर्ण मणिपूरमध्ये द्वेष कानाकोपऱ्यात पसरला असून भाजप आणि आरएसएसची विचारधारा द्वेषावर आधारित आहे. 29 जून रोजी झालेल्या हिंसाचारानंतर मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. मात्र पंतप्रधान मोदींना इथल्या लोकांच्या वेदना दिसत नाहीत. लोकांचे अश्रू पुसण्यासाठी ते अद्याप मणिपूरमध्ये आलेले नसल्याची टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवास केला. या प्रवासात त्यांनी गरीब, महिला, मुले, पत्रकार, छोटे व्यापारी यांची भेट घेतली. आज पुन्हा ते मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढत आहेत. देशातल्या जनतेने त्याच्या पाठीशी उभे राहून ताकद दाखवावी, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशातील जनतेला केलं.
मणिपूरच्या थोबल जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात होत आहे. राहुल गांधी यासाठी राजधानी इंफाळमध्ये दाखल झाले आहेत. धुक्यामुळे राहुल गांधींच्या विमानाने उशिराने उड्डाण केलं. दुसरीकडे यात्रा सुरू होण्यापूर्वी मणिपूर सरकारने काही निर्बंध घातले आहेत. हा कार्यक्रम एक तासापेक्षा जास्त चालू नये, असं मणिपूर सरकारने म्हटलं आहे. तसंच सहभागी होणाऱ्यांची संख्या 3,000 पेक्षा जास्त नसावी. कार्यक्रमाचं ठिकाण राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागेल, असं मणिपूर सरकारने म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.