तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. यात ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात मधू गौर यास्की आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाने ज्युबली हिल्समधून माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला उमेदवारी दिलीय.(Latest News)
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने शुक्रवारी तेलंगणा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पक्षाने सायंकाळी ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. ही बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीसाठी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे प्रदेश प्रभारी माणिक राव ठाकरे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी आणि इतर नेते उपस्थित होते.
तेलंगणा विधानसभेसाठी ११९ जणांना उमेदवारी देण्यात येणार आहे. काँग्रेसने आतापर्यंत १०० उमेदवारांची घोषणा केलीय. प्रत्यक्षात पहिल्या यादीत ५५ तर दुसऱ्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय. तर उर्वरित जागांवर पक्ष लवकरच उमेदवार देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याआधी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केलीय. टी राजा सिंह यांना भाजपने गोशमहल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर संजय कुमार बंदी यांना करीमनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात राजेंद्र एटाळा हे दंड थोपटणार आहेत.
तर काँग्रेसने तेलंगणा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी ५५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये पक्षाचे राज्य युनिट प्रमुख अनुमुला रेवंत रेड्डी कोडंगलमधून आणि तेलंगणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांना हुजूरनगरमधून उमेदवारी दिलीय.
दरम्यान, तेलंगणा विधानसभेची निवडणूक ३० नोव्हेंबरला होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील एकूण ३५, ३५६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यात शहरी भागातील १४ हजार ४६४ मतदान केंद्रे आणि ग्रामीण भागातील २० हजार ८९२ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.