Congress Agitation
Congress Agitation  Saam Tv
देश विदेश

वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, आजपासून "महागाई मुक्त भारत" आंदोलन

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: सध्या देशात वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. इंधनाच्या भावात रोज वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळणार आहे. या महागाई विरोधामध्ये काँग्रेस (Congress) आजपासून महागाई मुक्त भारत आंदोलन करणार आहे. ३१ मार्च ते ७ एप्रिलच्या दरम्यान 'महागाई मुक्त भारत' आंदोलन करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात ३ टप्प्यात धरणे आंदोलनाने केली जाणार आहे.

हे देखील पहा-

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याविषयी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्रात (center) मोदी सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकारने (Modi government) लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरु केल्याचे सुरजेवाला यांनी यावेळी म्हणाले होते. तर 'राजा करे महल की तैयारी, प्रजा गरीबी महागाई की मारी' असे म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) देखील इंधनाच्या वाढत्या भावावरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते. कच्च्या मालाच्या भावात वाढ झाल्याचा बोजा तेल कंपन्या ग्राहकांवर टाकत आहेत.

यामुळे मागील काही दिवसापासून सातत्याने इंधनाच्या भावात वाढ होत आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच २२ मार्च दिवशी इंधनाच्या भावात वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून सतत भाव वाढत आहेत. आजपासून राज्यभर महागाई मुक्त भारत आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी दिली. आज सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. यानंतर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयामध्ये महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित करण्यात आले आहे. तर ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईमध्ये (Mumbai) महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच 'गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. निवडणुकीमध्ये जनतेच्या रोषाला सामारे जायला नको, म्हणून इंधन भाववाढ रोखून धरली आणि निवडणुका संपले आहेत, मते घेतली, निवडून आले आणि लगेच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली. सध्या सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे भावही वाढले आहेत. १ एप्रिलपासून औषधांचे भावही वाढणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या जाळ्यात लोटत आहेत. त्याविषयी त्यांना काही वाटत नाही. मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशात जनता सध्या भोगत आहे. केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च म्हणजे आजपासून सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : न्यायालय अवमान प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून बाबा रामदेव यांना मोठा दिलासा

Air Cooler Precautions | कूलरचा शॉक लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची?

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

Breaking: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मोठी कारवाई! फॉरच्युनरमधून तब्बल 1.14 कोटींची कॅश जप्त

Hair Care Tips: 'या' चुका केल्यामुळे होते केस गळती

SCROLL FOR NEXT