खूशखबर! आता LPG सिलेंडर मिळणार 634 रुपयांना; कसा ते जाणून घ्या
खूशखबर! आता LPG सिलेंडर मिळणार 634 रुपयांना; कसा ते जाणून घ्या Saam Tv
देश विदेश

खूशखबर! आता LPG सिलेंडर मिळणार 634 रुपयांना; कसा ते जाणून घ्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर तुम्हाला ही बातमी वाचून आनंद होईल. कारण आता तुम्हाला फक्त 633.50 रुपये देऊन LPG गॅस सिलिंडर मिळणार आहे. हो! हे खरे आहे. परंतु आता तुम्ही वापरत असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 4 ऑक्टोबरनंतर LPG सिलिंडरच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाहीये. पण तरीही तुम्ही LPG गॅस सिलिंडर 633.50 रुपयांना खरेदी करू शकता.कसा ते जाणून घ्या.

कंपोजिट एलपीजी सिलेंडर (Composite LPG Cylinder)

खरं तर, आम्ही त्या सिलेंडरबद्दल बोलत आहोत, ज्यात गॅस डोळ्यांना दिसतो ही आणि 14.2 किलो जड गॅसच्या सिलेंडरपेक्षा हलका आहे. LPG गॅस सिलिंडर सध्या दिल्लीमध्ये 899.50 रुपयांना मिळत असेल, परंतु एक 'कंपोजिट सिलेंडर' तुम्हाला फक्त 633.50 रुपयांमध्ये भरता येईल. त्याच वेळी, 5 किलो एलपीजी 'कंपोजिट सिलेंडर' केवळ 502 रुपयांमध्ये भरता येईल. 10 किलो 'एलपीजी कंपोजिट सिलिंडर' भरण्यासाठी तुम्हाला 633.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

या शहरात होणार सिलेंडर उपलब्ध

हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंपोजिट सिलेंडरमध्ये सध्याच्या सिलेंडरपेक्षा 4 किलो कमी गॅस असेल. पहिल्या टप्प्यात हे कंपोजिट सिलेंडर दिल्ली, बनारस, प्रयागराज, फरीदाबाद, गुरुग्राम, जयपूर, हैदराबाद, जालंधर, जमशेदपूर, पाटणा, म्हैसूर, अहमदाबादसह 28 शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपोजिट सिलेंडर लोह सिलेंडरपेक्षा 7 किलोने हलका आहे. यात तीन थर असतात. सध्या वापरलेले रिकामे सिलेंडर 17 किलोचे आहे आणि गॅस भरल्यावर ते 31 किलोपेक्षा थोडे जास्त पडते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेरलं

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

Kshitij Zarapkar : अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT