Colombia Military Aircraft Crash Near Peru Border 66 Soldiers Death Saam Tv
देश विदेश

Plane Crash : १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; ६६ जणांचा मृत्यू

Colombia Plane Crash Update News : कोलंबियामध्ये हवाई दलाच्या C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात झाला असून आतापर्यंत ६६ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पेरू सीमेजवळ झालेल्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कोलंबियात C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात

  • १२५ सैनिकांपैकी ६६ जणांचा मृत्यू

  • पेरू सीमेजवळ दुर्घटना

  • अनेक जखमी

  • मानवी वस्तीपासून दूर असल्याने मोठा अनर्थ टळला

Colombia Military Aircraft Crash Near Peru Border 66 Soldiers Death कोलंबियामधून मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या हवाई दलाचे 'सी-130 हरक्यूलिस' या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतपर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक जण जखमी असल्याचं हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्ताने म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबिया हवाई दलाचे 'सी-130 हरक्यूलिस' हे विमान उड्डाण केल्यानंतर क्षणात कोसळून त्याला भीषण आग लागली. या विमानातून एकूण १२५ जवान प्रवास करत होते. हे विमान पेरूच्या सीमेजवळ असलेल्या प्यूर्टो लेगुइजामो येथून सैनिकांना घेऊन जात असताना दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर कोलंबियाच्या सैन्यदलात एकच खळबळ उडाली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. हे विमान मानवी वस्तीपासून साधारण ३ किलोमीटर दूर अंतरावर कोसळले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अजूनही घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे कोलंबियात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणात नवा वाद उफाळला

Hair Dandruff Removal Tips: केसांतला कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी करा 5 सोपे उपाय

Eyeliner Tips : 'आयलाइनर'शिवायही तुमचे डोळे सुंदर अन् रेखीव दिसतील; ट्राय करा 'या' सिंपल मेकअप ट्रिक्स

Dhurandhar 2 : झुकेगा नहीं साला! 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, ५व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? पगारवाढ कधी येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT