saam tv
देश विदेश

आंदोलक तरुणांवर लाठीमार, मोदी-शहांचं नाव घेत अभिजीत दीपकेचं पुन्हा आंदोलन; म्हणाला, सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका

Cockroach Janta Party Protest: दिल्लीत CJP च्या नेतृत्वाखालील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या चकमकींमध्ये ५० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत. दुसरीकडे अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक यांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलाय.

Bharat Jadhav

  • दिल्लीतील CJP आंदोलनाला संसद मोर्चादरम्यान हिंसक वळण

  • आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात 50 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी

  • परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर

संसदेकडे निघालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केल्यानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे पक्षाचा संस्थापक अभिजीत दीपके यांनीही शांततेच्या मार्गानं पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे.

आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेनंतर दुःख व्यक्त करतानाच, त्यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकृती खालावलेली असताना, पुन्हा उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या सोनम वांगचुक यांचा जीव धोक्यात असल्याची भीतीही दीपकेंनी व्यक्त केली. वांगचुक यांना काही झालं तर, त्याला हे सरकार आणि दिल्ली पोलीस जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके?

दिल्ली पोलिसांनी आज जे काही केलंय आहे, विद्यार्थ्यांना मारलंय, त्यांची डोकी फोडलीत, ते खूपच लज्जास्पद आहे. यामुळे जगभरात आपल्या देशाची बदनामी होत आहे. दिल्ली पोलिसांनी असं का केलं हे सगळ्यांना माहीत आहे. वरून आदेश आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून आदेश आले होते. दिल्ली पोलिसांनी १२ वर्षांच्या मुलीचं डोकं फोडलंय. यामुळे सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या पद्धतीने पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारलं, त्यामुळे मी उपोषण सुरू ठेवणार असल्याचे वांगचुक यांनी सांगितले. सोनम सरांनी उपोषण सुरू ठेवलं तर, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांचा जीव खूपच धोक्यात आहे. मेडिकल टीमशी बोलल्याप्रमाणे, सोनम सरांचं शरीर हे २०-२१ दिवसांचे उपोषण झेलू शकत होतं. त्यानंतरही त्यांनी उपोषण सुरू ठेवलं तर, त्यांच्या जीवाला धोका आहे. सोनम सरांना काही झालं तर याला हे सरकार, पोलीस जबाबदार असतील.

सोमवारी सीजेपीकडून संसद मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी दिल्ली पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. यात ५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत. दिल्लीतील आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं दिल्लीनंतर देशातील इतर राज्यात या आंदोलनाचे पडसाद उमटले. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहारातील विद्यार्थी आपल्या मागण्यासाठी रस्त्यांवर उतरले. दिल्लीत नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून 'कॉक्रोच जनता पार्टी'ने केलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात वाद झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

यादरम्यान अनेक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. पोलिसांनी जंतर-मंतर परिसर रिकामा केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांशी झालेल्या चकमकीत ५० पोलीस कर्मचारी जखमी झालेत. दिल्ली पोलीस हल्लेखोरांविरुद्ध बीएनएस (BNS) च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जातोय. यासह सीजेपीच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचाही समावेश आहे.

आंदोलनाचे संसदेत पडसाद

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे संसदेतही पडसाद उमटले. अधिवेशनात विरोधकांनी नीट पेपरफुटी आणि राम मंदिरातील चोरी प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर संसदेत गदारोळ झाला. विरोधक आक्रमक झाल्याने अनेक वेळा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato storage: टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवावेत की नाही?

Skipping Dinner Benefits: रात्रीचं जेवण बंद केल्यावर डेली रुटीनमध्ये काय बदलं होतो? जाणून घ्या ७ महत्त्वाचे परिणाम

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर ठिय्या, राहुल गांधींच्या ५ मागण्या कोणत्या?

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाचे देशभर पडसाद; २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवस्थानातील कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांच्या भावाकडून शिवीगाळ केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT