Ashutosh Ranka Saam Tv
देश विदेश

Ashutosh Ranka: आधी जमिनीवर पाडलं, नंतर दोरी अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण; आशुतोष रांकालाही सोडलं नाही, धक्कादायक VIDEO समोर

CJP Team Attacked: राजस्थानमध्ये सीजेपीच्या सदस्यांवर हल्ला करण्यात आला. शाळेची पाहणी करण्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी मारहाण केली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More
  • राजस्थानमध्ये आशुतोष रांका आणि सीजेपीच्या सदस्यांवर हल्ला

  • शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपी कार्यकर्त्यांना गावकऱ्यांकडून मारहाण

  • आशुतोष रांकाला पळवून पळवून मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर

  • राजस्थानमध्ये सीजेपीच्या वाहनांवर दगडफेक करत काचा फोडल्या

राजस्थानमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांवर भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली. सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्याच्या सहकाऱ्यांना राजस्थानमधील गावकऱ्यांनी घेरलं आणि नंतर मारहाण केली. आशुतोष रांकाला आधी धक्काबुक्की केली त्यानंतर पळवून पळवून मारहाण करण्यात आली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. आशुतोष रांकाने हल्ला करणारे भाजपचे गुंड होते असा आरोप केला. तर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेने भाजपचे गुंड सीजेपीच्या जीवावर उटले असल्याचा आरोप केला.

राजस्थानमधील शाळा सुधारण्यासाठी सीजेपीने मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या आशुतोष रांकावर आज भ्याड हल्ला झाला. शुक्रवारी सकाळी सीजेपीचे कार्यकर्ते शाळांना भेट देण्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी आधी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना मारहाण केली. यावेळी आशुतोष रांका यांना पळवून पळवून मारहाण करण्यात आली. सीजेपी सदस्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये त्यांच्या वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. कसं तरी सीजेपीच्या सदस्यांनी या जमावापासून आपली सुटका करून घेतली.

सीजेपीच्या सदस्यांनी दावा केला की, जयपूरजवळील कंवरपुरा गावातील रामपुरा येथील एक सरकारी शाळा म्हशींच्या गोठ्यातून चालवली जात आहे. शुक्रवारी सकाळी जेव्हा सीजेपीचे कार्यकर्ते या शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचले तेव्हा काही नागरिकांनी त्यांना विरोध करत हाकलून लावले. सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि आपण स्वतः घटनास्थळाला भेट देत असल्याचे जाहीर केले.

आशुतोष रांका आणि त्यांची टीम पोहोचण्यापूर्वीच गावकऱ्यांनी त्या सरकारी शाळेजवळ मोठी गर्दी केली होती. गावात पोहोचल्यावर जेव्हा आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमचे सदस्य कारमधून उतरून शाळेच्या दिशेने निघालेतेव्हा गावकऱ्यांनी त्यांना अडवले. सुरुवातीला थोडी चर्चा झाली पण नंतर गावकऱ्यांनी सीजेपीच्या सदस्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT