Supporters wearing cockroach masks gather at Jantar Mantar during the Cockroach Janata Party protest in New Delhi. saam tv
देश विदेश

सोशल मिडीयावर गर्दी, आंदोलनात केवळ दर्दी; दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार

Abhijit Dipke Leads CJP Rally, Demands Education Minister Resignation: गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चा सुरू होती ती 6 जूनची....कारण शनिवारी जगभरात बहुचर्चित असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन केलं. या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळाला? कॉक्रोच जनता पार्टीनं कोणती नवी घोषणा केलीय? पाहूयात हा रिपोर्ट....

Snehil Shivaji

चेहऱ्यावर कॉक्रोचचे मास्क... एका हातात बाबासाहेबांचं पुस्तक आणि एका हातात देशाचा तिरंगा घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवरून आज हजारो तरुणांची गर्दी झाली होती. तर दुसरीकडे हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात आले आणि थेट जंतरमंतरवरील आपल्या पहिल्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक देखिल उपस्थित होते.

सरन्यायधीशांनी बेरोजगार तरुणांना उपरोधाने कॉकरोच संबोधल्यानंतर सोशल मीडियावर या पक्षाची स्थापना झाली, आणि पाहता पाहता काही आठवड्यांतच सत्ताधारी पक्षापेक्षाही जास्त फॉलोवर्स या कॉक्रोच जनता पार्टीचे झाले. त्यात नीट पेपरफुटीनंतर देशातल्या तरुणाईमध्ये प्रंचड असंतोष दिसल्यानंतर थेट शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिल्यानंतर अण्णांच्या आंदोलनासारखं आंदोलन देशात उभं राहील अशी चर्चा राजकीय विश्वात सुरू झाली होती. मात्र सोशल मीडियाएवढा प्रतिसाद प्रत्यक्ष जंतर मंतर मैदानावरील पहिल्या आंदोलनात दिसून आला नाही. मात्र तरीही पोलिसांनी सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडलेली नव्हती.

देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता, परीक्षांमधील पेपरफुटी आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ या कॉक्रोच जनता पक्षाने आता थेट रणशिंग फुंकलंय. खरी गोम इथेच आहे. सोशल मीडियावरील डिजिटल लोकप्रियता पाहता सीजेपीची आज रस्त्यावर किती लोक आणू शकते, याची प्रत्यक्ष चाचणी परिक्षाच होती. आता दर शनिवारी आंदोलन करणार असल्याचं अभिजीत दिपकेंनी जाहीर केलंय. त्यामुळे आगामी काळात कॉक्रोच जनता पार्टीला कसा प्रतिसाद मिळतो याकडेच देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire: पुण्यात मध्यरात्री भीषण आग! पेंटिंग गोडाऊन जळून खाक, एका कामगाराचा मृत्यू

Fact Check : इलेक्ट्रिक स्कूटीचा स्फोट, चालकाच्या चिंधड्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Saturday Horoscope : कामकाजात नव्या संधी मिळतील, 5 राशींच्या व्यक्तींची होणार भरभराट; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: पुणे मनपा उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून सहा लाखांचा गंडा

Mumbai : लाईफलाईन बनतेय क्राईमलाईन, कल्याणच्या आणि डोंबिवलीच्या महिलांमध्ये सीटवरून भांडण

SCROLL FOR NEXT