how Cockroach Janata Party started Saam
देश विदेश

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी'ची कल्पना सुचली कशी? अभिजीत दीपकेंचा मोठा खुलासा, पाहा Exclusive मुलाखत

Cockroach Janata Party Viral Trend : ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही व्हायरल डिजिटल मोहीम कशी सुरू झाली? अभिजीत दीपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सर्व काही सांगितले.

Namdeo Kumbhar

How Did ‘Cockroach Janata Party’ Begin? : सध्या देशभरात आणि सोशल मीडियावर एका अनोख्या पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे, तो पक्ष म्हणजे 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janata Party). व्यवस्थेविरोधात आणि सिस्टीमविरोधात आवाज उठवण्यासाठी सोशल मीडियावर सुरू झालेल्या या डिजिटल मोहिमेने सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या मोहिमेचे जनक अभिजीत दीपके यांनी 'साम टीव्ही'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत, त्यांना ही अनोखी कल्पना कशी सुचली याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे . (Abhijeet Deepke Reveals the Real Story Behind Viral Digital Movement)

"ती कल्पना नव्हती, तर तो व्यवस्थेवरचा राग होता!" ounder Abhijeet Deepke Breaks Silence in Exclusive Interview

मुलाखतीदरम्यान ही कल्पना कशी सुचली, असा प्रश्न विचारला असता अभिजीत दीपके म्हणाले, "ही कोणती ठरवून केलेली कल्पना नव्हती, तर तो व्यवस्थेविरुद्ध मनात असलेला तीव्र राग होता." देशाच्या एका सर्वोच्च पदावरील व्यक्तीने सिस्टीमविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर हा राग अनावर झाल्याचे त्यांनी सांगितले.

सरन्यायाधीशांच्या (CJI) 'त्या' वक्तव्यामुळे झाली सुरुवात Abhijeet Deepke Explains ‘Cockroach Janata Party’

अभिजीत दीपके यांनी या मोहिमेमागचे मुख्य कारण स्पष्ट करताना सांगितले की, भारताच्या सरन्यायाधीशांनी (Chief Justice of India) एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यात त्यांनी म्हटले होते की, "जे लोक सरकार किंवा सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवतात, ते लोक बेरोजगार, आळशी आणि कॉकरोच (झुरळ) किंवा पॅरासाईट (परजीवी) सारखे असतात."

संविधानाच्या रक्षकांकडूनच अशी अपेक्षा नव्हती Why Thousands of Youth Are Supporting ‘Cockroach Janata Party

दीपके यांनी सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, "सरन्यायाधीश हे देशातील संविधानाचे आणि नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांचे रक्षक असतात. संविधानाने आपल्याला 'फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन' म्हणजेच बोलण्याचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. नागरिकांच्या याच अधिकारांचे रक्षण करणे ज्यांचे काम आहे, तेच जर आवाज उठवणाऱ्या सामान्य जनतेला आणि तरुणांना 'कॉकरोच' किंवा 'पॅरासाईट' म्हणत असतील, तर ही अत्यंत नाराजीची आणि गंभीर बाब आहे."

...आणि सोशल मीडियावर क्रांती झाली! how Cockroach Janata Party started

याच नाराजीतून आणि संतापातून अभिजीत दीपके यांनी आपल्या X अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. "जर सिस्टीम आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या देशातील तरुणांना हे लोक 'कॉकरोच' समजत असतील, आणि जर देशातील हे सगळे 'कॉकरोच' एकत्र आले तर काय होईल?" याच संकल्पनेतून 'कॉकरोच जनता पार्टी'चा जन्म झाला आणि पाहता पाहता या मोहिमेला सोशल मीडियावरील हजारो तरुणांचा पाठिंबा मिळून ही एक मोठी डिजिटल चळवळ बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यसभा निवडणुकीसांठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग; कोणाला मिळणार उमेदवारी? ही नावे चर्चेत

Expressways : महाराष्ट्राला मिळाले ४ नवीन द्रुतगती महामार्ग; ५१,९०६ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी, २०२८ पर्यंत प्रवास होणार सुस्साट

घरात जिकडे तिकडे झुरळं दिसतायेत? ही सोपी ट्रिक वापरा, झुरळ जातील मरून

Maharashtra News Live Update: कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक कालपासून नाशिक दौऱ्यावर

Leopard Attack : जुन्नरच्या लेकीचं धाडस, बिबट्याच्या जबड्यातून धाकट्या बहि‍णीला वाचवले, भल्या पहाटे पुण्यात थरार

SCROLL FOR NEXT