भारतीय तटरक्षक दलाने 10 पाकिस्तानींना पकडले; बोटही केली जप्त Saam Tv
देश विदेश

भारतीय तटरक्षक दलाने 10 पाकिस्तानींना पकडले; बोटही केली जप्त

भारतीय सागरी हद्दीमध्ये शिरलेल्या १० पाकिस्तानी नागरिकांना तटरक्षक दलाने पकडल्याची माहिती मिळाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : भारतीय सागरी हद्दीमध्ये शिरलेल्या १० पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांना तटरक्षक दलाने पकडल्याची माहिती मिळाली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिक 'यासीन' (Yasin) नावाच्या बोटीसह (boat) अरबी समुद्रात (Arabian Sea) भारतीय (Indian) सागरी हद्दीमध्ये शिरले होते. काल रात्रीच्या सुमारास एक ऑपरेशन (Operation) राबवून तटरक्षक दलाने ही मोठी कारवाई केली आहे.

हे देखील पहा-

यावेळी सुरक्षा दलाने एक पाकिस्तानी बोट देखील ताब्यात घेतली आहे. संबंधित सर्वांना चौकशीकरिता पोरबंदर याठिकाणी आणण्यात आले आहे.

संबंधित नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. भारतीय सागरी हद्दीमध्ये घुसखोरी केलेल्या बोटीला पकडण्याची ही पहिली वेळ नाही.

याअगोदर देखील भारतीय तटरक्षक दलाने खूपवेळा पाकिस्तानी बोटीवर कारवाई (Action) केली आहे. अलीकडेच मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तटरक्षक दलाने एका पाकिस्तानी बोटीला पकडले होते. यावेळी संबंधित बोटमध्ये १२ पाकिस्तानी नागरिक होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवाजी पार्क आंदोलन पोलिसांनाच भोवणार? विद्यार्थ्यांनी पाठवल्या पोलिसांना नोटीसा

फोन वापरून दिला नाही, हॉस्पिटलला छावणीचं स्वरूप...; नवीन व्हिडिओतून सोनम वांगचुकांचे धक्कादायक खुलासे

TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार मोकाटच, NEET पेपरफुटीचे 9 आरोपी राज्यात

आयोध्येनंतर बाळूमामा देवस्थानातही घोटाळा, देवस्थानात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; कर्जमुक्ती योजनेतील पहिली मोठी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT