CNG car fire  
देश विदेश

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

CNG Car Fire: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे धावत्या सीएनजी कारला भीषण आग लागून चालक प्रदीप कुमार यांचा मृत्यू झाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेली कार जळून खाक झाली.

Namdeo Kumbhar

उत्तर प्रदेशातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बाराबंकीमध्ये एका धावत्या सीएनजी (CNG) कारला अचानक भीषण आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की कार चालवणाऱ्या व्यक्तीला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. गाडीचे दरवाजे लॉक झाल्यामुळे चालकाचा आतमध्येच जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कार फक्त ६ महिन्यापूर्वीच विकत घेण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी वेगाने जात असताना अचानक कारच्या इंजिनमधून धूर निघू लागला. काही सेकंदांतच संपूर्ण गाडीने पेट घेतला. गाडीचा दरवाजा लॉक झाल्याने चालकाला बाहेर निघता आले नाही. त्यातच रात्रीची वेळ असल्याने त्या ठिकाणी कुणीही नव्हते. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली होती. पोलिसांनी दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. कारला आग नेमकी कशामुळे लागली? शॉर्ट सर्किटमुळे की सीएनजी लीक झाल्यामुळे? याचा तपास आता पोलीस आणि फॉरेन्सिक टीम करत आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृत चालकाची ओळख प्रदीप कुमार अशी पटली आहे. प्रदीप हे लखनौ विमानतळावर प्रवाशांना सोडून बाराबंकीहून घरी परतत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मध्यरात्री झाली, त्यावेळी रस्त्यावर कुणीही नव्हते. त्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. शनिवारी सकाळी ६ वाजता लोक तिथून जात असताना ही घटना उघडकीस आली आणि पोलिसांना कळवण्यात आले.

सीटवर फक्त हाडे शिल्लक

दुर्दैवी घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली. घटनास्थळी जेव्हा आजूबाजूचे नागरिक धावून आले, तेव्हा चालकाच्या सीटवर फक्त त्याचे अवशेष आणि जळालेली हाडेच शिल्लक राहिली होती. दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण प्रदीप याने ही नवीन सीएनजी कार अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच मोठ्या आवडीने विकत घेतली होती. कारमध्ये अचानक सीएनजी गळती (CNG Leakage) झाली किंवा शॉर्ट सर्किट झाले होते का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT