eknath shinde  saam tv
देश विदेश

Maharashtra vs Karnataka : धाडसीपणा सांगू नका, मी सीमावादासाठी...'; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Eknath Shinde News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. 'बेळगाव सीमा बाधावांबद्दल बोलणाऱ्यांनी धाडसीपणा आम्हाला सांगू नका. सीमावादाच्या प्रश्नासाठी हा एकनाथ शिंदे ४० दिवस तुरुंगात राहिला आहे, अशा शब्दात विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

दिल्लीत 'जी 20' साठीची सर्व पक्षीय बैठक संपली. या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी दर्शवली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, 'बेळगाव सीमेवरील बांधवांबद्दल बोलत आहेत, त्यांनी धाडसीपणा आम्हाला सांगू नका. हा एकनाथ शिंदे ४० दिवस तुरुंगात राहिला आहे. सीमेवरील गावात विस्तारीकरण चालू आहे'.

अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, 'अजित दादा तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका. अजित दादांनी काय केलं ? आरोपाला उत्तर देण्यासाठी आम्ही रिकामे नाही. आम्ही कामानं उत्तर देऊ'.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

'छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फोडण्याचा डाव आखला जात आहे. सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना केली जात आहे. फुटीरतेची बीजं इथं पेरली जात आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

अजित पवार काय म्हणाले होते ?

'शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे, हे या आधी कधीही घडलं नव्हतं असं अजित पवार म्हणाले. राज्यातील मोठमोठे उद्योग हे गुजरातला जात आहेत, असा आरोप देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

'कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगावात जाण्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखल्यानंतर राज्यातील मंत्र्यांनी माघार घेतली, सध्याची ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्र हे बघतोय, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT