Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: न्याय निष्पक्ष आणि पारदर्शक असावा; अरविंद केजरीवालांच्या अटकेवर अमेरिकेची प्रतिक्रिया

America Reaction On Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यावर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे.

Rohini Gudaghe

Arvind Kejriwal News Update

दिल्लीतील कथित मद्यविक्री घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सात दिवसांची ईडी कोठडी मिळाली आहे. २२ जानेवारी रोजी त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली ( Arvind Kejriwal Arrest) आहे. यावर आता जर्मनीनंतर आता अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी त्यांनी आक्षेप घेतला आहे. (latest politics news)

न्याय निष्पक्ष आणि पारदर्शक असावा, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, आम्ही भारताचे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते केजरीवाल यांच्या अटकेच्या वृत्तांवर लक्ष ठेवून आहोत. देशात न्याय्य कायदेशीर प्रक्रियेची आशा आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत जर्मनीच्या वक्तव्यानंतर भारताने जर्मन राजदूताला बोलावून तीव्र नाराजी (Arvind Kejriwal News) व्यक्त केली होती. या घडामोडींनंतरच या प्रकरणावर आता अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलीय. जर्मनीपाठोपाठ अमेरिकेनेही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या अटकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारताचे प्रमुख विरोधी पक्षनेते केजरीवाल यांच्या अटकेवर लक्ष ठेवून असल्याचं अमेरिकेचं म्हणण आहे.

कथित मद्यविक्री घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीने म्हटलं होतं की, या प्रकरणातील संपूर्ण कारवाई न्याय्य असावी. सीएम केजरीवाल यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा अधिकार (America Reaction On Arvind Kejriwal Arrest) देण्यात यावा. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही कायद्याचे राज्य आणि मूलभूत तत्त्वांवर भर दिला होता.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सेबॅस्टियन फिशर यांना केजरीवाल यांच्या प्रकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्ही दखल घेतली आहे. भारत हा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्याशी संबंधित मानके आणि मूलभूत लोकशाही तत्त्वे या प्रकरणात देखील लागू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

सीएम केजरीवाल यांच्या अटकेबाबत जर्मनीच्या टिप्पणीवर भारताने तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. भारताने जर्मनीच्या (Germany) राजदूताला बोलावून तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती. याप्रकरणी जर्मन मिशनचे डेप्युटी चीफ जॉर्ज एन्झ्वेलर यांना बोलावण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT