Shreya Maskar
येणाऱ्या वीकेंडला जवळच कुठे फिरण्याचा प्लान करत असाल तर केम्बुरली धबधबा बेस्ट लोकेशन आहे. येथे गेल्यावर सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
रायगड जिल्ह्यातील केम्बुरली गावात, मुंबई-गोवा महामार्गालगत केम्बुरली धबधबा वसलेला आहे. केम्बुरली धबधबा हा महाडजवळ आहे.
केम्बुरली धबधबा खडकाळ कड्यावरून खाली पडणाऱ्या एका अखंड आणि विलोभनीय प्रवाहासाठी, तसेच पावसाळ्यात बहरणाऱ्या आणि जिवंत वाटणाऱ्या आसपासच्या हिरव्यागार पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या धबधब्याला आवर्जून भेट द्या. फोटोशूट हे भन्नाट लोकेशन आहे. आताच वन डे ट्रिप प्लान करा.
धबधब्याचा हा अखंड आणि रुंद प्रवाह खाली एका लहान जलाशयात पडतो, ज्यामुळे पर्यटकांना थेट धबधब्याच्या खाली उभे राहता येते किंवा पाण्यात डुबकी मारून ताजेतवाने होता येते.
केम्बुरली धबधबा हे थंड हवेचे सुंदर ठिकाण आहे. तुम्ही येथे 'लॉन्ग-ड्राइव्ह' करून जाऊ शकता. कपलसोबत फिरायला हे बेस्ट लोकेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.