Rajapur Tourism : कोकणात दडलंय निसर्गाचं स्वर्गसुख! राजापूरची 'ही' ७ ठिकाणे फिरायला अजिबात चुकवू नका

Shreya Maskar

आंबोळगड बीच

आंबोळगड बीच हा अनोख्या खडकाळ रचनांनी नटलेला, शांत आणि कमी गर्दी असलेला समुद्रकिनारा आहे. येथे किनाऱ्यावरील झाडांच्या सावलीत आराम करता येतो किंवा सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहता येते.

Ambolgarh Beach | google

देवघळी बीच

रत्नागिरीतील सर्वात सुंदर आणि नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक देवघळी बीच आहे. विशाल कड्यांनी वेढलेल्या या ठिकाणी 'टेबल पॉइंट' नावाचे एक भव्य उंच ठिकाण आहे, जिथे अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Devaghali Beach | google

गावखडी बीच

काळी वाळू आणि रांगेत लावलेली पाइनची झाडे असलेला स्वच्छ समुद्रकिनारा म्हणजे गावखडी बीच होय. येथे तुम्ही फॅमिली ट्रिप प्लान करू शकता. कुटुंबासोबत फोटो काढण्याचा आनंद घेऊ शकता.

Village Khadi Beach | google

पूर्णगड किल्ला

मुचकुंदी खाडी आणि समुद्र यांच्या शांत संगमाचे दृश्य दाखवणारा एक छोटासा सागरी किल्ला म्हणजे पूर्णगड होय. कड्याच्या बाजूला बसून निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.

Purnagad Fort | google

सावतकडा धबधबा

सावतकडा धबधबा हा दाट आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेला, पावसाळ्यातील एक सुंदर धबधबा आहे. शहराच्या उष्णतेपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Sawtakada Falls | google

राजापूर गंगा

राजापूर येथील उन्हाळे गावात एका उंच टेकडीवर १४ वेगवेगळ्या आकाराचे मानवनिर्मित कुंड (पाण्याच्या टाक्या) आहेत, ज्यांना 'राजापूरची गंगा' म्हणून ओळखले जाते. हा निसर्गाचा एक अद्भुत आणि रहस्यमयी चमत्कार मानला जातो.

Rajapur Ganga | google

उन्हाळे गरम पाण्याचे झरे

हे झरे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानले जातात, कारण येथे जमिनीतून वर्षभर नैसर्गिकरित्या गरम पाणी बाहेर पडत असते.

Summer hot springs | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : वीकेंडला कुठे जायचं? आसनगावजवळची ५ सुंदर ठिकाणं देतात निसर्गाचा भन्नाट अनुभवआंबोळगड बीच

आंबोळगड बीच हा अनोख्या खडकाळ रचनांनी नटलेला, शांत आणि कमी गर्दी असलेला समुद्रकिनारा आहे. येथे किनाऱ्यावरील झाडांच्या सावलीत आराम करता येतो किंवा सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहता येते.

Asangaon Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...